नवी मुंबई: शुक्रवार दि.२२ डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता भवन,सेक्टर-१०,सानपाडा, नवी मुंबई या ठिकाणी 'गीता जयंती' च्या पवित्र दिनी पारस काव्य, कला, जनजागृती संस्था(रजि.) सानपाडा, नवी मुंबई तर्फे राज्यस्तरीय खुली काव्यलेखन स्पर्धा पारितोषिक वितरण व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा-२०२३ चे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध कवी नवनाथ ठाकुर यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाची विशेष नोंद घेऊन 'पारस काव्य,कला,जनजागृती संस्था' आयोजित प्रमुख पाहुणे आगरी कवितांचा बादशहा समजले जाणारे सुप्रसिद्ध जेष्ठ कवी पुंडलिक म्हात्रे यांच्या शुभ हस्ते व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत 'साहित्यभूषण पुरस्कार-२०२३' देऊन सन्मानीत करण्यात आले. आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. नवनाथ ठाकुर लिखित आगरी समाजातील विवाह समारंभात 'धवलगीत' गाणाऱ्या धवलारीनचे योगदान, धवलारीनचे महत्त्व वाढविणारे व तिच्या जीवनावर प्रकाश टाकणारे 'धवलारीन...एक आगरी पुरोहित!' हे पुस्तक वाचकांचे आवडीचे बनले. सदर पुस्तकाला प्रचंड मागणी व वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे एका गृहस्थाने सदर पुस्तकाच्या १५० प्रति मुलाच्या लग्नात मोफत वाटल्या. या पुस्तकाचे प्रकाशन '१८ वा अखिल भारतीय आगरी महोत्सव-२०२२ (डोंबिवली) येथे दणक्यात झाले. यानंतर नवनाथ ठाकुर यांचा विविध ठिकाणी एक साहित्यिक म्हणून सन्मान होऊ लागला. अवघ्या तीन वर्षात साहित्य क्षेत्रात कवी नवनाथ ठाकुर यांना १६ पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलेले आहे. या वर्षीचा साहित्य भूषण-२०२३ हा १७ वा पुरस्काराने सन्मानीत झाले. सुप्रसिध्द कवी नवनाथ ठाकुर यांना २०१९ मध्ये अर्धांगवायुचा झटका मारला होता.त्या भयंकर आजारावर मात करून त्यांनी त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव दिला आणि लेखणी त्यांच्या या आजारावर औषधाचे काम करू लागली.परिणामी अवघ्या तीन वर्षात त्यांनी १००० हुन अधिक कविता,चारोळ्या,लघुलेख,प्रवासवर्णने,गाणी,नाटकं,सूत्र संचलने इत्यादी लेखन केले. लॉकडाऊन हे नवनाथ ठाकुर यांच्यासाठी पर्वणीच ठरली. या वेळात त्यांनी भरपूर लेखन केले. तसेच विविध online स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपल्या कवितांचा ठसा समाज मनावर उमटवला. याचाच परिणाम 'राजयुवा प्रतिष्ठान-पुणे' या संस्थेचा संचालक गौरव पुंडे यांनी नवनाथ ठाकुर यांस ठाणे जिल्हा विभाग प्रमुख म्हणून नेमणूक केले. नवनाथ ठाकुर यांना याच समूहात 'लोकप्रिय कवी' हा किताब मिळाला. नंतर नवनाथ ठाकुर हे विविध राज्यस्तरीय काव्यस्पर्धांचे परिक्षणही करू लागले. अशाप्रकारे Whatsapp वरील विविध काव्य समूहांमध्ये सहभागी होऊन त्यांनी आपल्या कवितांचा खजाना सर्वांसमोर खुला केला. साहित्य क्षेत्रातील योगदान पाहून 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद'चे सभासदत्व स्वीकारून 'कल्याण-डोंबिवली महानगर अंतर्गत त्यांची अध्यक्ष म्हणुन निवड झाली.अर्थात् हा सन्मान साहित्याचा आहे.असे नवनाथ ठाकुर यांचे ठाम मत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कवितांमधून देव, देश, धर्म, संस्कृती, उत्सव, निसर्ग, क्रांतिवीर तसेच वास्तविक घडामोडीवर परखडपणे लेखन, यामुळे त्यांचा असलेला अध्यात्माचा गाढा अभ्यास व चिकित्सक वृत्तीचे दर्शन झाले. नवनाथ ठाकुर हे स्वाध्याय परिवारात गेल्या २५ वर्षांपासून सक्रीय आहेत. पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या युवा केन्द्रातूनच त्यांच्या या सुप्त गुणांना चालना मिळाली. त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत झाला.असे कवी नवनाथ ठाकुर यांचे ठाम मत आहे. नवनाथ ठाकुर यांना कंपनीत 'पुस्तक वेडा' म्हणून बोलतात. वाचनाची प्रचंड आवड असलेल्या या 'पुस्तकप्रेमी' ने स्वतःच्या घरात छोटे पुस्तकालय निर्माण केले. जे पुस्तक आवडले ते खरेदी करून संग्रह करणे.हा त्यांचा छंदच..!
आगरी समाजातील एक सर्वसामान्य व्यक्ति जेव्हा साहित्यिक म्हणून सन्मानीत होतो. तेव्हा आगरी समाज त्याला डोक्यावर उचलतो. म्हणून लेखक नवनाथ ठाकुर यांना अलिबाग येथे 'आगरी साहित्य शिरोमणी पुरस्कारा' ने सन्मानीत केले. अशा विविध ठिकाणी लेखक नवनाथ ठाकुर यांना सन्मानीत करण्यात आले. साहित्यभूषण हा पुरस्कार लेखक नवनाथ ठाकुर यांना त्यांचा साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात आलेला आहे. नवनाथ ठाकुर यांना 'साहित्यभूषण पुरस्कार' प्रदान झाल्यामुळे साहित्य क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.पंचक्रोषित त्यांच्यावर शुभेच्छांना वर्षाव होत आहे. कमी वेळेत इतका सन्मान मिळणे. हे देवाचे प्रेमच असू शकते आणि माझ्यावर देवाचे भरपूर प्रेम आहे.असे नवनाथ ठाकुर यांचे मत आहे. "अहंकाराचा वारा न लागो राजसा" यासाठी नवनाथ ठाकुर यांना मिळालेला सन्मान ते लगेच देवाला समर्पित करतात व देवाला सांगतात. हे तुझे प्रेम पत्रं आहेत.मी फक्त त्यांना सांभाळतो.
नवनाथ ठाकुर यांना मिळालेले पुरस्कारः
१) राष्ट्रीय कलम गौरव सन्मान-२०२० (राजस्थान)
२) लोकप्रिय कवी सन्मान-२०२०-पुणे
३) VOICE OF HEART - BEST WRITER AWARD-2020-जयपूर
४) श्री गणेश रत्न पुरस्कार-२०२१-पुणे
५) अष्टविनायक पुरस्कार-२०२१
६) VOICE OF HEART-2021-राजस्थान
७) दिवाळी काव्यरंग षटकावीर-२०२१-रत्नागिरी.
८) साहित्य गौरव पुरस्कार-२०२१-पुणे.
९) शब्द श्री साहित्य सन्मान-२०२२-जयपूर (राजस्थान)
१०) साहित्य श्री पुरस्कार- २०२२-पुणे
११) प्रोत्साहन पुरस्कार-सरस्वती मंदिर पडलेगांव-माजी शिक्षकांकडुन.)
१२) शब्द रत्न पुरस्कार-धुळे
१३) पी.सावळाराम राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार-२०२२
१४) आगरी साहित्य शिरोमणी पुरस्कार-२०२३ (अलिबाग)
१५) साहित्यरत्न पुरस्कार-२०२३ (कल्याण)
१६) गणेश वत्सल पुरस्कार-२०२३-पुणे
१७) साहित्यभूषण पुरस्कार-२०२३-नवीमुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा