ठाणे: आगरी युथ फोरम , डोंबिवली आयोजित १९ व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवात दिनांक १९ डिसेंबर रोजी संपूर्ण आगरी बोलीतील "कनगा" या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस, अध्यक्ष ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, आणि डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, अध्यक्ष,९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या शुभ हस्ते हजारो लोकांच्या समक्ष धुमधडाक्यात, दणक्यात करण्यात आले. प्रकाशनाच्या वेळी डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, साहित्य संस्कृती मंडळ, प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, आणि श्री. सुरेश देशपांडे, अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, डोंबिवली शाखा तसेच आगरी युथ फोरम चे अध्यक्ष श्री गुलाब वझे हे सर्व मान्यवर उपस्थित होते. सदर प्रकाशन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण संपुर्ण भारतासह जगभरातील अनेक देशात सुरू होते.
कनगा म्हणजे बांबुनी बनवलेली धान्याची साठवण करण्यासाठी बनविलेले कोठार, कनग्यात जसा धान्य साठवला जातो तसाच हा आचार आणि विचारांचा साठा श्री जयंत कृष्ण पाटील यांनी सर्वांसाठी खुला केला आहे..१६० पानांचा "कनगा" डाॅ.सदानंद पाटील यांची प्रस्तावनेने नटलेला आहे .तर कनग्याचे मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार श्री.प्रकाश पाटील यांनी साकारले आहे तसेच IPS पोलीस आयुक्त रेल्वे, डॉ. रवींद्र अनंत शिसवे यांच्या शुभेच्छा या काव्य संग्रहास आहेत.
बोलीभाषेतील आगरी समाजातील चालीरीती, संस्कृती, शेती,आगार,सण, परंपरा,भक्तीगीत(अभंग प्रभागात रचलेले), आरती, पोवाडे अशा विवीध प्रभागातील एकूण ७७ आगरी कविता आगरी बोलीभाषैत शब्दार्थांसहित तसेच समर्पक चित्र रेखाटना सोबत सजलेला आहे. चैत्र ते फाल्गुन या वर्षभरातील दिनक्रमानुसार त्याच्या क्रमाने येणार्या सण, उत्सव, हंगाम, शेती कामे तसेच इतर संमिश्र विषय त्याचप्रमाणे क्रमाने एक एक कविता उलगडत जाते हे या कनगा कविता संग्रहाचे वेगळेपण कवीने जोपासले आहे. सगळ्यांनी नक्की वाचा आणी आपली आगरी संस्कृती , गावच जीवन,अनुभवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा