आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २३ डिसेंबर, २०२३

भूमिपुत्र प्रतिष्ठान' (मध्य रेल्वे माटुँगा वर्कशाॕप) समूहाची द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभा टिटवाला येथे यशस्वीपणे संपन्न

ठाणे: शनिवार दि.१६ डिसेंबर रोजी सायं.०७:०० ते ०९:०० या वेळेत टिटवाला येथे (कॉ.दिनानाथ चौधरी यांचे फार्म हाऊस ) माटुँगा वर्कशॉपमधील 'भूमिपुत्र प्रतिष्ठान' समूहाची वार्षिक द्वितीय सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. सदर सभेचे संपूर्ण नियोजन 'भूमिपुत्र प्रतिष्ठान' गृपने केलेले होते.
     सभेचे अध्यक्ष म्हणून कॉ.दिनानाथ चौधरी यांची नेमणूक करण्यात आली होती. सर्वसाधारण सभेसाठी मिलिंद शेळके साहेब (केंद्रीय सचिव- महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना),श्री भगवान म्हात्रे ( ट्रेन मॅनेजर)
श्री राजू कदम (ट्रेन मॅनेजर)हे विशेष अतिथी म्हणून लाभले होते.सभेची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज व माता एकविरा यांच्या प्रतिमांना पुष्प हार परिधान करून व दीपप्रज्ज्वलनाने झाली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ, पेन व लेखक-नवनाथ ठाकुर यांचे 'धवलारीन...एक आगरी पुरोहित!' हे पुस्तक देऊन जेष्ठ कामगारांच्या शुभहस्ते स्वागत करण्यात आले.
   आनंद म्हात्रे यांनी सभेचे समालोचन उत्कृष्ट केले.त्यात त्यांनी 'भूमिपुत्र प्रतिष्ठान'चे मुख्य उद्दिष्टे व विविध उपक्रमांची माहिती व विस्तार सांगितला.'भूमिपुत्र प्रतिष्ठान' गृपमध्ये आगरी,कोळी,कुणबी,भंडारी व कराडी या जातीतील रेल्वे कामगार आहेत.तसेच ठाणे,रायगड,पालघर व मुंबई या चार जिल्हांतील कामगार समाविष्ट आहेत. विक्रम म्हात्रे यांनी वार्षिक जमा-खर्चाचा हिशेब मांडून वार्षिक आर्थिक अहवाल वाचन केले व पुढील वर्षातील नियोजित कार्यक्रमांबद्दल घोषणाही केली.तसेच नॕशनल रेल्वे मजदूर युनियन यांत्रिक शाखेचे सचिव कॉ.महेश मुंडे आणि रेल कामगार सेनेचे सचिव दिनेश खंडाळे यांनी आपल्या मनोगतात 'कुणाला काहीही अडचण असेल तर युनियनच्या माध्यमातून आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत. कधीही हाक मारा आम्ही आपल्यासाठी मदत करायला तयार आहोत.'असे विश्वासपूर्ण आश्वासन दिले. सभेमध्ये जयेश म्हात्रे यांची वेंडन इन्स्टिट्यूटवर निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. त्यानंतर सभेचे विशेष मान्यवर मिलिंद शेळके साहेब (केंद्रीय सचिव- महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. 'भूमिपुत्र प्रतिष्ठान' समूहाने कमी कारकिर्दीत राबवलेल्या विविध उपक्रमांबद्दल त्यांनी समूहाचे कौतुक व शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले, "भूमिपुत्र म्हणून काम करतांना आपल्या भूमिपुत्रालाच प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. जेव्हा निवडणूकीचा प्रश्न असेल तेव्हा आपल्या भूमिपुत्रासाठी आपले 'मत' राखून ठेवले पाहिजे.भूमिपुत्राला पुढे जाण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला हवे". कॉ.दिनानाथ चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित भूमिपुत्रांना ठणकावून समजावले कि,तुम्ही कुणाच्या ताळावर नाचू नका तर आपल्या ताळावर इतरांना नाचवता आले पाहिजे. विविध युनियनमध्ये काम करत असतांना कामगारांच्या हितासाठी झटता आले पाहिजे. कॉ.दिनानाथ चौधरी हे स्वतः कॕम्युनिस्ट संघटनेमध्ये कार्यरत असून विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करतात. अध्यक्षीय भाषणानंतर नवनाथ ठाकुर यांनी अध्यक्ष कॉ.दिनानाथ चौधरी यांचा सत्कार करून उपस्थित सर्व मान्यवर व भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या सदस्यांचे आभार मानून 'भूमिपुत्र प्रतिष्ठान' समूहातील सदस्यांना विनंतीपूर्वक संदेश दिला कि, संघटना टिकवायची असेल तर 'मी संघटनेसाठी आणि संघटना माझी' असं वाटलं पाहिजे आणि मतभेद होतील परंतु मनभेद करू नका.तरच संघटना टिकून राहिल.हा मोलाचा संदेश देऊन सर्वसाधारण सभा समाप्त झाली असे जाहिर केले.त्यानंतर सर्वांनी निसर्गरम्य वातावरणात सहभोजनाचा आनंद घेतला.
     अशाप्रकारे द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभा व पिकनिक असे दोन दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
भूमिपुत्र प्रतिष्ठान आयोजित विविध उपक्रमः
)गणेश प्रिय बौद्धिक स्तुत्य उपक्रमः
प्रतिष्ठानचे काही सदस्य त्यांच्या घरी गणेश उत्सवानिमित्त जमा झालेले शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वाटप करतात.
अ] २०२२ मध्ये मलंगगड येथील 'वसुदैव कुटुंबकम्' आश्रमातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
आ] २०२३ मध्ये शहापूरमधील उंबरवाडी व नांदवळ या दोन जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. 

)दिवाळी नविन नात्यांसोबत:
दिवाळी निमित्त 'भूमिपुत्र प्रतिष्ठान' मधील कामगार सदस्य स्व-खूशीने स्वतःच्या घरी बनवलेले फराळ, साड्या व उटणे इत्यादी.वस्तुंचे वाटप करून नविन नात्यांसोबत दिवाळी साजरी करतात. 
अ] दिवाळी निमित्त २०२२ मध्ये मुरबाडमधील गुलाबीवाडी व दहिगांव शेलारी पाडा या आदीवासी पाड्यात जाऊन महिलांना साड्या,मुलांना कपडे,चपला,ब्लॕंकेट,फराळ इ.वाटप केले. 
आ] २०२३ मध्ये शहापूरमधील उंबरवाडी या आदीवासी वाडीमध्ये महिलांना साड्या,फराळ व उटणे इ.वाटप केले.

)वृक्ष लागवड व संवर्धनः

प्रतिष्ठानच्या प्रत्येक सदस्याने ड्रॕगन फ्रुट व इतर फळझाडे आपापल्या घराच्या परिसरात लागवड करून वृक्ष संवर्धन मोहिम राबवली आहे.

४)ईको-फ्रेन्डली होळी:

होळीनिमित्त वीटभट्टी व आश्रमामध्ये जमा झालेल्या पुरणपोळ्या,करंज्या व पापड्या पॕकिंग करून वाटप करण्यात येते.

)वाढदिवस एक निमित्तः

माटुँगा काराखान्यातील प्रत्येक भूमिपुत्रापर्यंत पोहचावे या उद्देशाने व 'भूमिपुत्र प्रतिष्ठान' चा हेतू प्रत्येकाला कळावा म्हणून गेल्या दोन वर्षांपासून 'वाढदिवस एक निमित्त' हा उपक्रम राबवण्यात येतो.

६)भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शनः

माटुँगा रेल्वे कारखान्यात 'भूमिपुत्र प्रतिष्ठान' अंतर्गत 'न भूतो न भविष्यति' असा 'भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शन' हा उपक्रम राबवला.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन भूमिपुत्र आमदार मा.श्री.किसनजी कथोरे साहेब यांच्या शुभहस्ते, माटुंगा मध्य रेल्वे कारखान्याचे मुख्य कारखाना प्रबंधक मा.श्री.विवेक आचार्य यांच्या उपस्थितीत झाले व कार्याचे मुख्य आकर्षण ठरले ते महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री.प्रमोद (राजू दादा) रतन पाटील यांनी उपस्थिती.
    वरील प्रत्येक उपक्रमासाठी भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या प्रत्येक सदस्याने तन-मन-धन देऊन प्रतिष्ठानच्या प्रत्येक उपक्रमाचा आलेख उंचावण्यासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

देव फाउंडेशनचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अडवली भूतावली शाळेत विद्यार्थी सहाय्य उपक्रम संपन्न

नवी मुंबई(वैभव पाटील)  मुंबईच्या देव फाउंडेशन यांच्या वतीने नवी मुंबईतील अडवली भूतावली येथील महागरपालिकेच्या शाळा क्...