आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २३ डिसेंबर, २०२३

श्री क्षेत्र दत्त देवस्थान पिंगळ आळी, दिव- पेण याठिकाणी श्री दत्तजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

पेण (पंकज पाटील ) श्री क्षेत्र दत्त देवस्थान पिंगळ आळी, दिव-पो . वाशी, ता.पेण , जि.रायगड यांच्या सौजन्याने सालाबाद प्रमाणे मंगळवार दि. २६ डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा भक्तिभावाने साजरा होणार आहे . यावेळी सोमवार दि.२५ डिसेंबर रोजी रात्रौ ९:३० वा. हभप श्री धनंजय गद्रे (पाली - रायगड) यांचे सुश्राव्य कीर्तन ( रमाकांत गोपीनाथ पाटील मु. दिव यांच्या सौजन्याने) होणार आहे. तर रात्रौ १२:३० वाजता जय भवानी प्रासादिक भजन मंडळ, दिव यांचा भजनाचा कार्यक्रम होईल.
    दुसऱ्या दिवशी मंगळवार दुपारी १२ ते २ वा. श्री औदुंबर प्रासादिक संगीत भजन,दिव यांचा भजन कार्यक्रम , तर २:३० ते ३:३० दरम्यान श्री ज्ञानेश्वर शिवराम म्हात्रे यांचे प्रवचन होणार आहे. सायंकाळी हभप श्री धनंजय गद्रे (पाली - रायगड) यांचे श्री दत्तजन्मोत्सवाचे कीर्तन ( हार्मोनियम साथ - श्री शांताराम गजानन पाटील, तबलासाथ श्री सुभाष शांताराम पाटील, घोडाबंदर) होईल. त्यानंतर आरती , तीर्थप्रसाद, महाप्रसाद असे कार्यक्रम संपन्न होतील .याच दिवशी रात्रौ ९:३० वा. समर्थ कृपा प्रासादिक भजन मंडळ, माणगाव, तसेच श्री राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ , कुंडेवहाळ, पनवेल यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
  तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी, बेडेकऱ्यांनी या श्री दत्त जयंती महोत्सवात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

देव फाउंडेशनचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अडवली भूतावली शाळेत विद्यार्थी सहाय्य उपक्रम संपन्न

नवी मुंबई(वैभव पाटील)  मुंबईच्या देव फाउंडेशन यांच्या वतीने नवी मुंबईतील अडवली भूतावली येथील महागरपालिकेच्या शाळा क्...