आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ७ डिसेंबर, २०२३

यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्यावतीने ""बढते कदम की ओर" परिसंवादाचे आयोजन

नवी मुंबई ( सुभाष हांडे देशमुख): मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त “बढते कदम की ओर…” या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून परिसंवादाच्या प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रन उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमास सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा परिसंवाद शनिवार दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी, सकाळी ०९.०० ते दुपारी २.०० या वेळेत यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई, नरिमन पोंइंट येथे रंगस्वर सभागृहात संपन्न होणार आहे. 
  संगीत, शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, पत्रकारीता, उद्योग, नाविण्यता तसेच समाजमाध्यमे या क्षेत्रांमध्ये जे दिव्यांग आपापल्या परीने छाप उमटवत आहेत व जे नवोदित आहेत आणि या क्षेत्रांमध्ये काहीतरी करू पाहत आहेत या सर्वांच्या प्रयत्नांना साथ मिळावी या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन चव्हाण सेंटरमार्फत करण्यात आले आहे.     
      दोन सत्रांमध्ये हा परिसंवाद होणार असून पहिल्या सत्रात दिव्यांगावर मात करून प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तीं योगिता तांबे- तबला व इतर वाद्य वादक, नवनीत कुलकर्णी- साहित्य, अनुजा संखे – पत्रकार व नोकरी, या कार्यक्रमास वक्ते म्हणून लाभले आहेत.  
      दुसऱ्या सत्रात मिनाक्षी निकम - दिव्यांग महिला, स्वयंरोजगार, प्रकल्प, फरीदा लांबे - दिव्यांगत्व, शिक्षण आणि समावेशन, अभिजीत राऊत - वैश्विक ओळखपत्र व दिव्यांगांचे अधिकार, डॉ. सुमित पाटील – दिव्यांग क्षेत्रात नाविण्यता, कविता मुरूगकर – सुगम्यता या विषयांवर त्या क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.  
     आरोग्य दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक विभाग यशवंतराव चव्हाण सेंटर च्या विभाग प्रमुख दीपिका शेरखाने व कार्यक्रमाचे संयोजक विजय कान्हेकर यांनी संयुक्तपणे पत्रक काढून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे सर्वांना आवाहन केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क - मनीषा खिल्लारे - 90227 16913

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आदिवासी पाड्यावर बालदिन साजरा

मुंबई: कांजूरमार्ग पूर्व येथील एक सेवाभावी संस्था यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये जागतिक बालदिन साजरा केला ...