आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

श्री जय गणेश मित्र मंडळ आयोजित आम्ही कोकणकर प्रस्तुत नमन प्रयोगाला रसिकांचा उत्स्फुर्तपणे प्रतिसाद

 मुंबई (शांताराम गुडेकर /दिपक मांडवकर )
                 कोकण ही कलेची पंढरी म्हणून ओळखली जाते. "नमन" ही लोककला फेमस आहे. तसेच कोकणच्या मातीत स्थापित लोककलेला वाव मिळाला तसेच ही लोककला यापुढे ही अशीच जोपासता यावी म्हणून अनेक कलाकार प्रयत्न करत असतो. तसेच कोकणच्या मातीत स्थापित झालेला व नव्याने ओळख असलेला कलामंच म्हणजे "आम्ही कोकणकर" यांचा प्रथम शुभारंभ प्रयोग श्री जय गणेश मित्र मंडळ आयोजित आम्ही कोकणकर प्रस्तुत नमन प्रयोग सोमवार (दि.२७ नोव्हेंबर २०२३ )रोजी विलेपार्ले येथील मा. दीनानाथ नाट्यगृह मध्ये साजरा झाला.या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात हा कार्यक्रम अनेक कलाकारांना संधी उपलब्ध करून देत एक विलक्षण कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम हाऊसफुल झाला.यामध्ये अनेक रील्स स्टार सहभागी होते.खूप नावीन्य पूर्ण नमन सोहळा रसिक राजाला पहायला मिळाला.गोड साखरेची कडू कहाणी"कोकणकन्या " चे होणार सादरीकरण या कार्यक्रममध्ये करण्यात आले.लवकरच पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहोत असे आवाहन लेखक/ दिग्दर्शक कृष्णा येंदे यांनी केले आहे. कोकणातील तरुण युवक - युवती एकत्र येऊन प्रथमच नावीन्य पूर्ण "नमन" सोहळा मुंबई रंगमंचावर मोठ्या धमाक्यात सादर झाला.
            आता पर्यंत फक्त खेळे येऊन नाचून जायचं पण या "नमन" सोहळयात आपले पूर्वज यांचे दर्शन घडवुन संकासुर चे कथा नावीन्य पूर्ण सुंदर असे साजरिकरणा सह गणरायाचे स्वागत ढोल ताशा पथकाच्या गजरात मिरवणूक काढून स्वर संगीत आरती गाऊन रसिक राजा भक्तीत तल्लीन झालं. पुढे राधा कृष्णा याची "अमर प्रेम कहाणी" रसिक राजाला पाहताना अश्रू व ओठांवर राधे राधे कृष्ण हे नाव अखंड मनात राहिले.शेवटी श्रीकृष्ण याचा प्रबोधन गीत रसिक राजाला विचार करायला भाग पाडलं . नाट्यकला कृती "कोकणकन्या" गोड साखरेची कडू कहाणी रसिक राजाला भावली अनेक सामाजिक जाणून करून गेली. एकतदरीत संपूर्ण "नमन" सोहळा सुंदर संकल्पना सह संपन्न झाला.या कार्यक्रमला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. त्याचा आयोजकांतर्फे शाल.श्रीफळ, पुष्पकरंडक देऊन सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील

दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...