आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

सुरज हॉस्पीटल सानपाडा आणि ग्रुप ग्रामपंचायत काराव (गडब) यांच्या तर्फे आरोग्य शिबीराचे आयोजन

गडब (अवंतिका म्हात्रे) पेण तालुक्यातील गडब ( काराव ) यांच्या तर्फे रविवार दि. ३ डिसेंबर रोजी महा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, सदर शिबीराच उदघाटन मा. सौ मानसी मंगेश पाटील सरपंच ग्रुप ग्रा पं काराव गडब यांच्या शुभहस्ते होणार असून सदर प्रसंगी मा . उपसरपंच सौ संध्या संतोष म्हात्रे , ग्रामसेविका - राजश्री धनावडे या उपस्थित राहणार असून, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आर एन . पालविया, डॉ. सतिश पवार, डॉ . दिनकर पाटील, व डॉ . प्रितम पाटील उपस्थित राहणार आहेत . सदर शिबीरात एक्सरे, इसीजी, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, ऑडीमेट्री टेस्ट व तज डॉक्टरांचा सल्ला दिला जाणार आहे सदर प्रसंगी डॉ आर एन पाटील - मेंदू , मनका विकार तज्ञ, डॉ . उदय पाटील हृदयविकार तज्ञ,डॉ . रमा पाटील मेंदू विकार तज्ञ,डॉ . अंजली पाटील मानसोपचार तज्ञ तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळणार आहे .
    सदर शिबिराचा लाभ ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन ग्रुप ग्रामपंचायत कारावतर्फे करण्यात आला आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील

दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...