आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

कोकण महोत्सवात रंगणार कोकणातील समई महिला नृत्य कलापथकाचा कलाअविष्कार ;ब्राम्हणदेव महिला मंडळ,( नाद भोळेवाडी ) जपते ही लोककला

मुंबई - ( शांताराम गुडेकर /दिपक कारकर )कोकणात विविध लोककला लोकप्रिय आहेत आणि त्या पाहायला मिळतात.प्रत्येक तालुका/जिल्ह्यात त्या प्रांतनुसार तिथल्या लोककला आजही संवर्धित होताना दिसतात.अशीच एक महिलांनी सादर केलेली समई नृत्यकला "ब्राम्हणदेव महिला मंडळ अनेक वर्षे सादर करून रसिक मनावर अधिराज्य गाजवत आहे. कोकणातील देवगड तालुक्यातील नाद,भोळेवाडी येथील एका छोट्याश्या आणि दुर्गम गावातील महिला ज्यांचे सरासरी वय जवळपास ४५-५० आहे, हि मंडळी आपली कला सादर करण्याकरिता कोकण महोत्सव निमित्त मुंबईत स्व.अटल बिहारी वाजपेयी मैदान, कोकण नगर बस स्टॉप समोर,भांडुप ( प. ) येथे शुक्रवार दि.८ डिसेंबर २०२३ रोजी रात्रौ ७ वा.सदर नृत्य प्रकार सादर होणार आहे.आत्मविश्वास, शिस्तबध्द नियोजन,अतोनात प्रयत्न, नियमित सराव आणि विविध प्रकारच्या पैलू सादर करून सिंधुदुर्ग जिल्हात कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळवत नृत्य कलेचं नावलौकीक केलं आहे.पाहण्यासारख्या आणि महिलांनी सादर करणाऱ्या कला महोत्सवाला रसिक प्रेक्षकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री ब्राम्हणदेव सामाजिक सेवा मंडळ नाद,भोळेवाडी (मुंबई) तर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

देव फाउंडेशनचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अडवली भूतावली शाळेत विद्यार्थी सहाय्य उपक्रम संपन्न

नवी मुंबई(वैभव पाटील)  मुंबईच्या देव फाउंडेशन यांच्या वतीने नवी मुंबईतील अडवली भूतावली येथील महागरपालिकेच्या शाळा क्...