आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

जेष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते लक्ष्मण वाघमारे यांचा आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते सन्मान

मुंबई (अधिराज्य)-आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ व एकनिष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण बाबा वाघमारे यांना इंदू मिलचे प्रणेते, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले.
लक्ष्मण बाबा वाघमारे हे आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ व आंबेडकरी चळवळीतील जूने जाणते कार्यकर्ते, आपलं सर्वस्व आपल्या निष्ठेवर अर्पण करणे म्हणजे काय याच जिवंत उदाहरण म्हणजे लक्ष्मण बाबा वाघमारे, कोणताही बडेजाव न करता प्रामाणिकपणे आंबेडकरी चळवळीशी, आंबेडकर घराण्याशी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी आजीवन एकनिष्ठ राहण्याचे व्रत घेतलेले लक्ष्मण बाबा वाघमारे हे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणावेळी एकोणीस वर्षांचे होते; बाबासाहेबांच्या राजगृह ते चैत्यभूमी या अंत्ययात्रेत ते प्रत्यक्ष सहभागी होते, लक्ष्मण वाघमारे आज मितीस ८६ वर्षांचे असून महापरिनिर्वाण दिन ते आजवर दरवर्षी ६ डिसेंबरला अविरतपणे चैत्यभूमीला दर्शनासाठी जात असतात, बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेतील प्रसंग सांगताना आजही त्यांचे डोळे पाणावतात, यावर्षी ६ डिसेंबर रोजी स्वतःच्या मासिक पेन्शनमधील एक महिन्याची रु. २५,०००/- पेन्शन चैत्यभूमीवर भीमसैनिकांना भोजनदानास दिले हे कौतुकास्पद, याही वयात त्यांचा बाबासाहेबांप्रति असलेला जिव्हाळा व तळमळ हे नवीन पिढीस प्रेरणादायी आहे अश्या एकनिष्ठ ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करताना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे ही उर भरून आले होते.
   सदर प्रसंगी रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समाज भूषण काकासाहेब खंबाळकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रकाशभाऊ खंडागळे, मुंबई दक्षिण जिल्हाध्यक्ष भगवान साळवी, भीमराव कांबळे, नितीन कांबळे, सतीश गाडे, मंगेश जाधव तसेच रिपब्लिकन सेना, बौद्धजन पंचायत समितीचे सभासद कार्यकर्ते उपस्थित होते त्यासर्वांनी लक्ष्मण बाबा वाघमारे यांचे अभिनंदन केले, सदर पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर मन भरून आल्याने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नसले तरी लक्ष्मण बाबा वाघमारे यांच्या पाणावलेल्या डोळ्यांचा कडा मूक कृतज्ञता व्यक्त करीत होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आदिवासी पाड्यावर बालदिन साजरा

मुंबई: कांजूरमार्ग पूर्व येथील एक सेवाभावी संस्था यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये जागतिक बालदिन साजरा केला ...