आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

बौद्धजन पंचायत समिती सहकारी पतपेढीची सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती सहकारी पतपेढीचा ४१ वा वार्षिक अहवाल व वार्षिक सर्वसाधारण सभा पतपेढीचे अध्यक्ष किशोर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बौद्धजन पंचायत समिती स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई - १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
     सदर सभेस बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत व उपसभापती विनिद मोरे यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून सभेची शोभा वाढवली, सदर सभेचे सूत्रसंचालन सहचिटणीस प्रकाश कसे यांनी केले, कार्यक्रमाच्या प्रारंभी या वर्षाअखेर पर्यंत बौद्धजन पंचायत समिती व सहकारी पतपेढीच्या दिवंगत झालेल्या सभासदांना सभागृहात शांतता पाळून मूक भावश्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
     सदर सभेस पतपेढीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष किशोर मोरे, उपाध्यक्ष संजय कापसे, सरचिटणीस सुभाष मर्चंडे, सहचिटणीस प्रकाश कासे, खजिनदार सुरेश गायकवाड, संचालक तुळशीराम शिर्के, कल्पना तुकाराम भगत, तज्ञ संचालक सचिन एच. गायकवाड, सुरेश सि. जाधव (मंचेकर) आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते; त्याप्रसंगी सहकार क्षेत्रातील तज्ञ पांडुरंग साळवी व राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी अनेक मार्गदर्शक सूचना मांडल्या त्याप्रसंगी सभागृहाच्या वतीने संचालक मंडळाने सदर सुचनांचे स्वागत केले व लवकरच त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन दिले.
    सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत व उपसभापती विनोद मोरे यांनी सहकार क्षेत्रातील स्पर्धेच्या युगात आपण कस टिकून राहील पाहिजे, खातेधारक व पतपेढी यामध्ये असणारा विश्वासाचा दुवा कसा टिकवून ठेवत पतपेढीच्या उत्कर्षासाठी कोणकोणत्या उपाययोजना राबविल्या पाहिजे व सदर पतपेढीचे बँकेत रुपांतरण करता येईल यावर मौलिक मार्गदर्शन केले.
   सदर सभेत सर्वच प्रस्तावांचे स्वागत करण्यात आले व सभागृहाने त्यांस सर्वानुमते मंजुरी दिली तसेच संचालक मंडळाने सभागृहाच्या वतीने ४१ व्या वार्षिक अहवालाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करून सर्वानुमते अहवाल पास करून सदर अहवालास मंजुरी दिली, नवीन कार्यकारिणी मंडळ जे अत्यंत सुनियोजित पद्धतीने काम करत आहे त्यांचे ही कौडकौतुक करण्यात आले, सरतेशेवटी सहचिटणीस प्रकाश कासे यांनी सर्वांचे आभार मानून सभेची सांगता केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आदिवासी पाड्यावर बालदिन साजरा

मुंबई: कांजूरमार्ग पूर्व येथील एक सेवाभावी संस्था यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये जागतिक बालदिन साजरा केला ...