आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

राजारामशेठ विद्यालय व सिद्धिविनायक स्कूल मध्ये “वाचन प्रेरणा दिन”

मुंबई : भारतरत्न राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञान साधनेत मग्न होते म्हणून आज १५ ऑक्टोबर ही त्यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी केली जावी अशी इच्छा प्रगट त्यांनी केली होती.  
         भांडुपच्या राजारामशेठ विद्यालय, सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल, आर.एस ज्युनिअर कॉलेज यांनी संयुक्तरित्या शाळेच्या भव्य मैदानावर ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी खानविलकर व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भारतरत्न राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे बालपण, तरुणपण, त्यांचे कार्य, त्यांचे देश प्रेम, देशासाठी त्यांनी दिलेले योगदान यांची माहिती दिली. 
     याप्रसंगी शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावून शाळेतील वाचनालयात असलेल्या हजारो पुस्तकातून आपल्या आवडीप्रमाणे एकादे पुस्तक निवडावे व त्याचे ‘मननवाचन’ शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी करावे म्हणजे वाचनाचा बुद्धीवर व मनावर काय परिणाम होतो याचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता येवू शकतो. विद्यार्थ्यानी सातत्याने वाचन केले पाहिजे हे समजावून सांगितले. 
       याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी खानविलकर म्हणाल्या की अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन होणे आवश्यक आहे. आम्ही शाळेत दर आठवड्याला एक तास शाळेत अवांतर वाचनासाठी राखीव ठेवतो वाचन संस्कृती ही व्यक्तिमत्व विकास घडवते आम्ही दरवर्षी सर्व पालकांना शाळेला एक पुस्तक दान करा असे आवाहन करतो त्यामुळे शाळेत सुसज्ज वाचनालय तयार झाले आहे. हल्ली संगणकीय युगात ‘वाचन’ आपण विसरून गेलो आहे. हे घातक आहे मुलांना लहानपणापासून वाचनाची गोडी पालकांनी लावावी अशी अपेक्षा मुख्याध्यापिका रश्मी खानविलकर यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश

मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...