आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

मुंबई शिक्षक मतदार संघाला हवाय “तरुण शिक्षक आमदार चेहरा” : शिक्षणतज्ञ रमेश खानविलकर

मुंबई ( प्रतिनिधी )मुंबई शिक्षक आमदार मतदारसंघ निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे ‘शिक्षक पुढारी’ शिक्षक मतदार नोंदणीच्या कामाला लागले आहेत.प्रत्येक शाळांमध्ये भेट देणे ,दैनंदिन कामकाज झाले आहे . सध्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षाची स्थिति दर दिवशी बदललेली असते त्यामुळे सन २०२४ मध्ये होणाऱ्या शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढविण्यात शिक्षकांपेक्षा राजकीय पक्षाचे वयाने जेष्ठ असलेले पुढारी अधिक मेहनत घेत आहेत. वय वर्ष ७० च्या आसपास गेलेले व संघटना मध्ये कार्यरत असलेल्याना ‘शिक्षक आमदार’होण्याची ईच्छा आहे. 
 या बाबत शिक्षणतज्ञ रमेश खानविलकर म्हणाले की मुंबई शिक्षक आमदार मतदार संघाला सन २०२४ मध्ये पक्ष विरहित तरुण शिक्षक आमदार ची गरज आहे जो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसावा तो फक्त आणि फक्त ‘शिक्षकच’ असून तरुण असावा. गेल्या १५/२० वर्षात शिक्षण व्यवस्थेची काय अवस्था आहे हे विधानमंडळात अनेकवेळा चर्चेत आले आहे. 
    या बाबत शिक्षणतज्ञ रमेश खानविलकर यांनी आपली भूमिका मांडताना म्हणाले की गेल्या पंधरा वर्षापासून प्रत्येक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाचे जेष्ठ नेते शिक्षक आमदार म्हणून पक्षाची उमेदवारी घेतात निवडून आल्यावर पक्षाचे धोरण राबवतात. शिक्षण व्यवस्था पालक,विद्यार्थी,संस्था,व शिक्षक सर्वच एकाच झाडाच्या फांद्या आहेत त्या झाडाचे संगोपन करत नाहीत. 
     मुंबई शिक्षण विभागाचे तिन भाग आहेत उत्तर ,पश्चिम ,व दक्षिण या तिन्ही कार्यालयाचे कामकाज करण्याची पद्धती वादग्रस्त आहेत अधिकारी वादग्रस्त आहेत. त्यामुळे सन २०२४ मध्ये होणारे ‘शिक्षक आमदार’ हा पक्ष विरहित ,तरुण असला तर तो शिक्षकांना अधिक न्याय देईल, ज्येष्ठांनी शांत बसावे तरुणांना पुढे आणावे , त्यांना मार्गदर्शन करावे , तरुण आमदार ही ‘शिक्षकच हवाय’ त्याला प्रशासनाची माहिती हवी ,कार्यपद्धती ची माहिती हवी व तो शिक्षक आमदार असताना त्याने शिक्षका बरोबरच , शिक्षण संस्था ,प्रशासन विद्यार्थी, पालक व शासन यांच्या बरोबर विचार विनिमय करून सर्वांच्या अडचणी सोडवाव्यात या सर्वाना सोडून फक्त पक्षासाठी काम करू नये राजकीय पक्ष विरहित शिक्षक आमदार मुंबईला हवाय ! अशी अपेक्षा शिक्षणतज्ञ रमेश खानविलकर यांनी व्यक्त केली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश

मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...