दुर्गा माता
(अष्टाक्षरी काव्य लेखन)
🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
दिव्य असे देवी दुर्गा
श्रेष्ठ शक्ति महाकाली
महिषासूरमर्दिनी!!!!
जगदंबा शक्तिशाली!!..१
मूल ब्रम्हांड निर्माती
आदीशक्ति अष्ट भूजा
ब्रम्हांडाची संरक्षक
दुर्गामाता करी पूजा !!..२
भागवत पुराणात
देवी दुर्गा मातारूप
असे मानले प्रतिक
नारी शक्तीचे स्वरूप !!..३
परमसत्यरूपिणी !!!!
देवी दुर्गेचे वर्णन
केले आहे सविस्तर
देवी दुर्गेचे पुराण!!..४
दयावान सर्वव्यापी
पूजतात सारे भक्त
कृपा तयेची सदैव_
तिच्या निर्गुण रूपात!!..५_
शैलपुत्री, चंद्रघंटा
कालरात्री, नारायणी
सिध्दिदात्री, महागौरी
सती, ही ब्रह्मचारिणी!!..६
शंख,चक्र,गदा धारी
पाश,धनुष्य नि तीर
रस्सी नि अभयहस्त
भाला,ढाल,तलवार!!..७
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
✍️श्री.नवनाथ एकनाथ ठाकुर
खिडकाळी-ठाणे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा