आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ८ जानेवारी, २०२३

चिरनेर येथील अनुदानित आश्रमशाळेला दिल्या स्वयंपाकासाठी आवश्यक चीजवस्तू

नवी मुंबई : उरण तालुक्यातील चिरनेर या महागणपतीसाठी सुप्रसिध्द असलेल्या गावातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेला लायन्स क्लब बॉम्बे गेट वे च्या माध्यमातून ८ जानेवारी रोजी स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी, कुकर, स्टील ग्लास अशा विविध वस्तूंची भेट देण्यात आली.
     आपल्या पालकांपासून दूर राहणाऱ्या या मुलांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, केवळ परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण सोडून देण्याची वेळ येऊ नये, त्यांनी शिकून मोठे व्हावे यासाठी आम्हाला अशा शिक्षण संस्थांना मदत देण्यात आनंद लाभतो अशी भावना यावेळी युसुफ मेहरअली सेंटरच्या माजी चेअरमन व लायन्स क्लब बॉम्बे गेट वे च्या माजी अध्यक्ष उषा शाह यांनी यावेळी व्यक्त केली. सदर प्रसंगी व्यासपीठावर लायन्स क्लब बॉम्बे गेट वे च्या विद्यमान प्रेसिडेण्ट माया बजाज, ग्रामीण विभागीय माजी चेअरमन उषा तेंडुलकर, माजी कॅबिनेट सेक्रेटरी फाल्गुनी शेठ, दै. आपलं नवे शहरचे उपसंपादक राजेंद्र घरत, या शाळेची शिखर संस्था श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ-बार्शी चे  मुख्याध्यापक आप्पासाहेब मोरे, शाळेचे  अधीक्षक सतिश मोरे उपस्थित होते. २००३ पासून चिरनेर येथे चालवल्या जाणाऱ्या या शाळेत पनवेल, उरण, पेण परिसरातील आदिवासी, पारधी, कातकरी, ठाकरं अशा समुहगटातील १२९ मुली व १२६ मुले शिक्षण घेत आहेत.   कार्यक्रमप्रसंगी मुलामुलींनी सुंदर गीतांनी पाहुण्यांचे स्वागत केले व समुहनृत्येही सादर केली. सर्व पाहुण्यांनी यावेळी आपले समयोचित विचार मांडले. या शाळेचे मोडकळीस आलेले स्वयंपाकघरही लायन्स वलब बॉम्बे गेट वे च्या माध्यमातून व्यवस्थित बांधून देऊ असेही वलबच्या प्रेसिडेण्ट माया बजाज यांनी सांगितले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन महादेव डोईफोडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

खान्देशनी अहिराणी बोलीला गुगलनी मान्यता ; अहिराणी मायबोलीसाठी अभिमाननी घडी- प्रा.विकास पाटील

कल्याण : ( प्रतिनिधी - सुनिल इंगळे ) खान्देशनी मातीनी गोडवा,संस्कृतीनी ओळख आनि लोकजीवननी आत्मा म्हंजे अहिराणी बोली. वर्षानुवर्ष...