आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ३० मे, २०२६

खान्देशनी अहिराणी बोलीला गुगलनी मान्यता ; अहिराणी मायबोलीसाठी अभिमाननी घडी- प्रा.विकास पाटील

कल्याण : ( प्रतिनिधी - सुनिल इंगळे ) खान्देशनी मातीनी गोडवा,संस्कृतीनी ओळख आनि लोकजीवननी आत्मा म्हंजे अहिराणी बोली. वर्षानुवर्षे गावखेड्यात, शेतशिवारात, लोकगीतांत,गप्पागोष्टींत जपली गेलेलीअहिराणी आता नवी उंचीवर पोचली शे.गुगलसारख्या जगप्रसिद्ध तंत्रज्ञान मंचावर अहिराणी बोलीला मान्यता मिळी गेली,ही खान्देशसाठी मोठी अभिमाननी गोष्ट शे.आता अहिराणी भाषा इतर भाषांसारखी गुगल कीबोर्डवर टाईप करता येणार शे.डिजिटल दुनियामं आपली मायबोलीनं स्थान मिळणं म्हणजे फक्त तंत्रज्ञाननी सोय नाही, तर आपली ओळख,आपलो इतिहास आनि संस्कृतीला मिळालेली मोठी दाद शे.या यशामागं अनेक वर्षांची मेहनत,सातत्य आनि भाषेवरील प्रेम लपलेलं शे. जागतिकअहिराणी भाषा संवर्धन परिषद,उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ,विविध सामाजिक-सांस्कृतिक संघटना,अहिराणी भाषा प्रेमी, साहित्यिक, कवी, बोली भाषा संवर्धक यांचाअथक प्रयत्न आज सफल ठरला शे.अनेकांनीअहिराणी बोली फक्त बोलण्यात नाही, तर लिखाण,कविता, लोकपरंपराआनि साहित्याच्या माध्यमातून जिवंत ठेवायनी धडपड केली.अहिराणी बोली ही फक्त भाषा नाही,तर खान्देशनीअस्मिता शे. गावोगावनी लोकजीवन, नातेसंबंध,हास्य,दुःख, परंपरा आनि माणुसकी या बोलीत जिवंत दिसे शे.आज गुगलनी मान्यता मिळणं म्हणजे नव्या पिढीला मायबोलीशी जोडायनी मोठी संधी मिळाली शे.आता वेळ आली शे की आपण सगळ्यांनी अहिराणी अभिमानानं बोलवी,लिहवी आनि पुढल्या पिढीपर्यंत पोचववी.कारण जी भाषा टिके,ती संस्कृती टिके…आनि जी संस्कृती टिके,तीच समाजनी खरी ओळख बनून राहे शे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

खान्देशनी अहिराणी बोलीला गुगलनी मान्यता ; अहिराणी मायबोलीसाठी अभिमाननी घडी- प्रा.विकास पाटील

कल्याण : ( प्रतिनिधी - सुनिल इंगळे ) खान्देशनी मातीनी गोडवा,संस्कृतीनी ओळख आनि लोकजीवननी आत्मा म्हंजे अहिराणी बोली. वर्षानुवर्ष...