आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २८ मे, २०२६

गोरेगावात ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्ड चे वितरण

मुंबई : महाराष्ट्र स्टेट परीवहन महामंडळ (एसटी ) यांच्या वतीने ज्येष्ठाना एसटी प्रवास सुखकर व आनंददायी होण्यासाठी 'एनसीएमसी' सवलतीच्या दरात प्रवासी कार्ड देण्याचे जाहीर केले . या योजने अंतर्गत सिनिअर सिटीझन हेल्थ केअर फाउंडेशन - ऐरोली यांच्या वतीने विरंगुळा संकल्प ज्येष्ठ नागरिक व विसावा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन विरंगुळा संकल्प ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालय, गोरेगाव पश्चिम येथे उत्साहात संपन्न झाले.
          शिबिरात ८० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. हे कार्ड ६५ वर्षी वरील जास्त ज्येष्ठ व्यक्ती साठी असल्याने ६० ते ६५ वर्षा खालील ज्येष्ठाना लाभ घेता आला नाही. काही ज्येष्ठाची लॉगिन न झाल्याने त्याना लाभ घेता आला नाही. काही सभासद गावी गेल्या मुळे शिबिरात फक्त ५३ ज्येष्ठाना, फेस्कॉमचे अध्यक्ष -आण्णासाहेब टेकाळे,व फेस्कॉम आरोग्य कमेटीचे अध्यक्ष - विवेक देशपांडे यांच्या सहकार्याने सदर शिबिर आयोजित केले होते. शिबिरात सभासदांन कडून रु २००/ नाममात्र फी आकारण्यात आली होती.
       शिबीर यशस्वी करण्यासाठी 
विरंगुळा संकल्प ज्येष्ठ नागरिक संघ चे अध्यक्ष -दिलीप धारकर, उपाध्यक्ष - शांताराम खामकर, कार्यकर्ते - हेमंत पई, सुधाकर पेडामकर, नरसिहं पै व विसावा ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी - रोहिदास बुद्धिवंत यांनी फारच मेहनत घेतली होती. सदरहू शिबीर माहे जून च्या प्रथम आठवड्यात पुन्हा घेण्यात येईल असे अध्यक्ष - दिलीप धारकर यांनी जाहीर केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगावात ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्ड चे वितरण

मुंबई : महाराष्ट्र स्टेट परीवहन महामंडळ (एसटी ) यांच्या वतीने ज्येष्ठाना एसटी प्रवास सुखकर व आनंददायी होण्यासाठी 'एनसीएमसी' सवलतीच्य...