आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

सातपुडा गणेशोत्सवात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन



मुंबई :
गोरेगाव पूर्व येथील, सातपुडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, बाळासाहेब ठाकरे ब्लड बँक ट्रामा केअर म्युनिसिपल हॉस्पिटल, जोगेश्वरी रुग्णालय, जोगेश्वरी पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने, गणेशोत्सवात भव्य  रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. 

  शिबिरात ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त दात्याना मंडळाच्या वतीने तुळशीचे रोपटे, आमदार सुनील प्रभू, नगरसेवक- तुळशिराम शिंदे व उपस्थित मान्यवारांच्या हस्ते देण्यात आले.
    या वर्षी मंडळाने चित्रकला, नृत्य स्पर्धा, विद्यार्थी व  ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आयोजित केला होता. मंडळाचं हे ११ वे वर्ष असून, गणेश मूर्ती विफूल जाधव यांनी साकारली आहे. रक्तदान शिबिरास प्रिया पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. या वर्षी रणजित भोसले (अध्यक्ष), ऋषिकेश राणे ( सचिव ) व संदीप राणे ( कार्याध्यक्ष  ) आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पवईतील आंबेडकरी चळवळीतील युवा तडफदार धाडसी नेतृत्व हरपले

पवई (प्रतिक कांबळे): पवईतील आय.आय‌‌.टी संकुलात कामास असलेले आंबेडकरी विचारधारेचे युवा तडफदार धाडसी नेतृत्व सदैव समाजकार्य करण्यासाठी तत्पर अ...