१८८५ सालातील काॅग्रेस पक्षाची स्थापना , १३७ वर्षे काँग्रेसला झाली.स्वातंत्र्य पूर्व काळातील आहे.भारत स्वतंत्र करण्यासाठी तत्कालीन काॅग्रेस नेत्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला. भारतीय लोकशाही,भारतीय संविधानिक घटना यावेळच्या नेत्यांनी तयार केली त्यावर भारत मार्गक्रमण करीत आहे. पंडीत जवाहरलाल नेहरू , लालबहाद्दूर शास्त्री,इंदिरा गांधी यांचे कुशल नेतृत्व लाभले . राजीव गांधी यांच्या नंतर काॅग्रेसच्या नेतृत्वाला घरघर लागली. तरीही काॅग्रेस घटनेच्या चौकटीत राहून पक्ष चालवत आहेत. २०१४ पासून काॅग्रेसची पीछेहाट होत गेली याला काॅग्रेस नेत्यांनी केलेल्या चुका कारणीभूत आहेत. पन्नास वर्षांपासून गल्ली ते दिल्ली सर्व ठिकाणी काॅग्रेस सत्तेवर होती. तरीही कालांतराने मतदारांनी काॅग्रेसला सत्तेपासून दूर केले. आता , सत्तेच्या खुर्चीवर बसलेले लोकांना मतदार सत्तेपासून दूर करतील .अन्य कोणी सत्तेच्या खुर्चीवर बसेल. २०१४ पासून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. देशातील घडामोडीचा परिणाम सत्ताधारी पक्षावर होता.मोदींनी घेतलेले सर्वच निर्णय मतदारांना पसंद आहेत असे नाही. महाराष्ट्र राज्यात प्रादेशिक पक्षांना नेस्तनाबूत करण्यासाठी उचलेले पाऊल योग्य नाही. महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या आमदार, खासदार यांच्या मागे शासकीय तपास यंञणांचा ससेमिरा लाऊन हैराण करणे हे शहाण्याचे लक्षण नाही. महाराष्ट्र , मराठी माणूस यांच्या नेतृत्वाला बळी पडतो आहे हे दुर्दैव. येणाऱ्या लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणूकांमध्ये चिञ स्पष्ट होईल. काॅग्रेसची सत्ता मतदार घालवू शकतो तर इतरांनी सुद्धा बोध घ्यायला हवा.
- महादेव गोळवसकर ,कल्याण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा