मुंबई - ( दिपक कारकर )चिपळूण तालुक्यातील वाय.बी.सी.सी.क्रिकेट क्लबच्या वतीने सामाजिक,शैक्षणिक विकासाकरिता मुंबईत दोन अंकी नाट्यपुष्प आयोजित करण्यात आले आहे.शिस्तप्रिय पण सदैव "मी" पणाच्या अहंकारात गुरफटलेल्या,पैशापुढे सारी नाती , कर्तव्ये तुच्छ मानणाऱ्या,अखेर दैवगती फिरल्याने हतबल झालेल्या एका अभागी उद्योगपती ची कहाणी,अश्रू आणि हास्याने बहारलेले सामाजिक आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचं हृदयस्पर्शी दोन अंकी नाट्यपुष्प."चांदणे शिंपित जा" हा नाट्यप्रयोग रसिक प्रेक्षकांना पाहण्यासारखाच आहे.
या नाटकाचे लेखक - कै.मधुसूदन कालेलकर,दिग्दर्शक- सुभाष गोताड,संगीत- राजेंद्र अवेरे,प्रकाश योजना - कु.निलेश रामगडे,नेपथ्य-उल्हास सुर्वे,रंगभूषा-वामन गमरे तर कलाकार सचिन वेले,शैलेश नावले,श्रीनिवास रामगडे,जितेंद्र रामगडे,विजय वेले,सतिश वेले, कु.प्रसाद रामगडे,आकाश वेले, सुवर्णा मिसाळ,राजश्री जमदाडे, मिलन गोताड आदींची भूमिका रसिक प्रेक्षकांना भुरळ पाडणारी आहे.
सदर नाट्यप्रयोग रविवार दि.१० एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०.०० वा.सुप्रसिद्ध मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह,विलेपार्ले ( पूर्व ) येथे होणार असून,सामाजिक सौख्य राखणाऱ्या उपरोक्त मंडळाच्या उपक्रमाला कलेला,आणि सामाजिक कार्याला योगदान देण्याचं आवाहन मंडळाने केलं आहे.अधिक माहितीसाठी सतिश वेले-९५९४५८४२७८,कल्पेश कुळे-९७७३३३३७६२,राजन नावले-९०८२७१८७२५,श्रीनिवास रामगडे- ७०२१४२०४२७ यांच्याशी संपर्क साधावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा