केवळ गरिबांनाच नव्हे तर सर्वसामान्य नोकरदार मध्यमवर्गीयांना सुद्धा खाजगीत उपचार घेणे परवडत नसल्याने अशा तमाम सर्वसामान्य माणसांना शासकीय रुग्णालये हीच फार मोठी आधार वाटतात, आशास्थान असतात परंतु राज्यभरातील शासकीय रुग्णालयातून बाल, स्त्री, नेत्र रोग अशा महत्वपूर्ण तज्ञ डॉक्टरांची सुमारे 75 टक्के पदे रिक्त असल्याचे वाचनात आले खरं म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी ही चिंता वाटणारी व वाढवणारी बाब आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही कारण तज्ञ डॉक्टर अभावी आपणास वेळीच ट्रीटमेंट मिळेल की नाही ही धास्ती वाटणे, असा विचार मनात येणे सहाजिकच आहे आणि म्हणूनच शासनाने प्रत्येक शासकीय रुग्णालयात जरूर तेवढ्या संख्येने तज्ञ डॉक्टर लोकांच्या सेवेला रहातील व वेळीच गरजूंना उपचार मिळतील त्यांची परवड होणार नाही अशी कायमस्वरूपी नियोजन, व्यवस्था करावयास हवी असे वाटते, हेच मानवतेचे महान कार्य आहे.
-विश्वनाथ पंडित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा