आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ९ एप्रिल, २०२२

गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे चैतन्य समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

मुंबई (प्रतिनिधी)- विक्रोळी टागोर नगर येथील  ज्येष्ठ समाजसेवक व गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे यांना नवचैतन्य सामाजिक विकास संस्था यांच्यावतीने डोंबिवली येथील भोईर सभागृहात विविध क्षेत्रात समाजकार्य करणार्‍या कार्यकर्त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्या कार्यक्रमात विनोदी अभिनेता भूषण कडू, मास्टर समाजरत्न  लोकशाहीर राजगुरू फिल्म सेन्सॉर बोर्डाचे    .विलास खानोलकर .नित्यानंद वाळंज , ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र  लंकेश्री यांच्या हस्ते राज्यस्तरीय नवचैतन्य समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यावेळी त्यांना स्मृतिचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन मोठ्या थाटामाटात सत्कार करण्यात आला..

    प्रारंभी संस्थापक अध्यक्ष श्री संतोष गोपाळ सावंत यांनी उल्लेखनीय कार्याबद्दल दखल घेऊन प्रामाणिकपणे कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्य करणारे गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे यांची निवड केली त्यांचे सामाजिक कार्य असल्याने त्यांची निवडीस पात्र आहेत व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या स्वतःचे घर सांभाळून नोकरी करत असताना सामाजिक कार्यात स्वतःला झोकून घेऊन देश सेवा करत आहेत त्यांचे कार्य योगदान पाहून  समाधान झाल्याने त्यांना पुरस्कार देऊन गौरव केला त्यावेळी त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे . ज्येष्ठ समाजसेवक व गुणवंत कामगार राजेंद्र कांबळे मा राजेंद्र जाधव.अषटपैलू कलाकार  राजेंद्र सावंत बोदधाचारय  श्रीपाल कांबळे  तसेच वनिता फाउंडेशन च्या अध्यक्षा वनिता कांबळे इत्यादींनी कौतुक केले व राष्ट्रगीताने  कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाली भाषेत मुनी म्हणजे मन आणि वर म्हणजे राजा ज्याने स्वतःचा मनाला जिंकले आहे तो मनाचा राजा झाला अशी जगातील एकमेव व्यक्ती बुद्ध होय - सुगंध भिवा कदम

मुंबई  (रामदास धो. गमरे) तथागत गौतम बुद्धांच्या समता, शांती, मैत्री या संदेशाची जगातील सर्वच विद्वानांना जाणीव झाली म्हणूनच ब्रह्मदेशातील रं...