अध्यक्ष -स्व रामदासजीं दगडू जीं बुंदे शिक्षण संस्था ,उरण रायगड
शिक्षण -BA.BSL. MBA.
अनुभव-शिक्षण संथा. स्पर्धा परीक्षा मार्गदशर्क /HR manager / UPSC, MPSC परीक्षे चा अनुभव
सोनाली बुंदे ह्यांचे शिक्षण नगरपरिषद शाळेत झाले . यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात त्यांचे शिक्षण झाले..
लोकांसाठी जगणं आई आणि आजोबा कडून त्या शिकल्या. आई नगरपरिषद च्या दवाखान्यात नर्स होत्या. तर बाबा फ़ॉरेस्ट मध्ये वनरक्षक.आजोबा नामी पहेलवान. अशा घरात सोनाली बुंदे यांचा जन्म झाला.
सौ.सोनाली मॅडम कॉलेज मध्ये होत्या तेंव्हा पासूनच लोक कल्यानां साठी लढत आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील कुमारी माता प्रकरण मध्ये त्यांनी काम केले.गडचिरोली मध्ये लीगल एड कॅम्प त्यांनी केले.तळा गाळातील लोकांना आपले अधिकार कळावे ह्या साठी त्या कायम तत्पर होत्या.कॉलेज मध्ये शिकणाऱ्या मुलींना कसे अभ्यासात व्यस्त करता येईल ह्यावर त्यानी काम केले.2003 मध्ये पुसद इथे गरीब मुलांसाठी आदर्श बालक मंदिर उघडले.आपल्या मैत्रिणी च्या साहाय्याने नी घरा घरातील मुलं जमा करून त्यांना चांगले शिक्षण आणि संस्कार त्यांनी दिले .लिटिल हार्ट्स प्री स्कूल उरण येथे उभ केले.मुलांना आणि पालकांना योग्य ते मार्गदर्शन त्या आजही करतात.स्व रामदासजीं दगडुजी बुंदे NGO उरण रायगड अंतर्गत खूप सारे उपक्रम बुंदे यांनी राबविले .श्रम दान शिबीरत सुद्धा मॅडम मुलांना मार्गदर्शन करतात.परीक्षेत अपयश आलं म्हूणन आत्महत्या करणाऱ्या मुलांसाठी काउन्सालिंग सेशन घेतात.किल्ले, रांगोळी, भाषण ह्या अशा उपक्रम करणाऱ्यांना स्व रामदासजीं दगडुजी बुंदे शिक्षण संथा उरण कडून प्रमाणपत्र मॅडमनी दिले.बोरी इथे झालेल्या किल्ले आणि रांगोळी स्पर्धेतील मुलांना प्रमाण पत्र देण्यात आले.लिटिल हार्ट्स प्री स्कूल उरण अंतर्गत मुलांना झाडें लावा झाडें जगवा हा उपक्रम दरवर्षी राबवले जातात.स्वच्छ भारत मोहिमे अंतर्गत मुलांसाठी आपला परिसर स्वच्छ कसा ठेवावा ह्या साठी त्यांनी लिटिल हार्ट्स प्री स्कूल मध्ये प्रोग्राम घेतला.डॉक्टर डे च्या दिवशी डॉक्टरांचा आणि पालकांचा संवाद मॅडम दरवर्षी लिटिल हार्ट्स प्री स्कूल कुंभारवाडा उरण इथे घेतात.बालकांचा सर्वांगीन विकास पालकांनी आणि शाळेनी कसा घडवावा ह्यावर त्या वेळो वेळी पालकांशी सवांद करतात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा