आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ८ मार्च, २०२२

सौ. सुमनताई संग्राम तोगरे

विश्वात सात आश्चर्याची नोंद प्रसिध्द आहे पण कमी अधिक दर्जाची व गुणवत्तेची काही अनभिज्ञ आश्चर्य अस्तित्वात असतील.त्याची गुणधर्मानुसार उपयोगिता अन् उपलब्धता जीवनाला उपकारक कि हानीकारक ह्याचा छडा लागल्यावरच ठरवणे इष्ट ठरेल.मात्र नित रोज आपल्या बाजूलाच अनपेक्षितपणे काही लहान सान घटना आश्चर्यकारक  घडतात.काही चमत्कारी व्यक्तिमत्व आपल्या समोर वावरत पण आपले लक्ष्य नसत.आपल्या व्यस्त संसारींक जीवनात मग्न असल्याने या अश्चर्यमंडीत व्यक्तीमत्वाचा गंध नसतो. ज्या वेळेस मनुष्य काही क्षण स्वतःस विसरून दुस-याचा विचार करतो, थोडा मागे वळून आस्थेनं पहातो, अत्मिकतेन जवळीक साधतो, प्रेमळतेन व कल्पकतेन आणि चाणाक्ष चक्षुन निरीक्षण करतो ते तुलना करताना स्वतःतील न्युनता व समोरच्याची भव्यता ध्यानी येते.किमानपक्षी तो योग्यता शोधतो व श्रेष्ठत्व मान्य करतो काय हे आठवे आश्चर्य ठरत नाही?
    अशेच एक प्रभावी व्यक्तिमत्त्व आपणास कधी तरी अन् कुठे तरी दिसले असेल पण परिचय नसल्याने नव्हे कधी मागोवा न घेतल्याने ते अंधारातच होते.
अशा व्यक्तीमत्वाचा आपणास परिचय करून देत आहे. त्या रायगड जिल्हा, उरण तालुक्यातील केगावच्या सौ.सुमनताई संग्राम तोगरे. ६२ वर्षीय अंधारातील पणती प्रमाणे सदा प्रकाश पसरवित आहेत. लौकिकार्थाने त्या अशिक्षित परंतु सुशिक्षितांना लाजवेल अशी हुशार कुशाग्र बुध्दीच्या चतूर. स्मरण शक्ती इतकी अगाध कि ३०-३५ वर्षा पुर्वीचा एखाद्या प्रसंग विचारता त्या दिवस, वार,तारीख सहित घटणाक्रम लिलया सांगतील.
घराच संपूर्ण अर्थ खात त्यांच्याच हाती पण चुकूनही खोट नाही कि गोंधळ नाही. अनपढ असूनही चार मुलांचं संगोपन करताना, उच्चशिक्षित करताना शिलाई काम,दुध विक्री व एन.ए.डी. मध्ये दारोदार फिरून रेडिमेड कपडे विक्री करून सुमनताई तोगरे यांनी आपला संसार सांभाळला.

   अन्येक अडचणींचा सामना करताना महिला वर्गाची कुचंबना होताना पाहून द्रवित मनाने त्यांनी महिलांसाठी काही तरी वेगळे केले पाहिजे, त्यांना स्वावलंबी बनविले पाहिजे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाच्या " महिला बचत गट" योजनेची माहिती घेऊन २००९ मध्ये दीन दुबळ्या झोपडपट्टीतील १६ महिलांना घेऊन मुक्ताई महिला उत्कर्ष मंडळाची  स्थापना करून सर्वानुमते अध्यक्ष व  संचालिका म्हणून आज तागायत निःस्वार्थ पणाने कार्यरत आहेत.गटाचं  संकलन व पंचायत समितीच्या अर्थ साह्यातून महिलांचा उत्कर्ष होताना पाहून दुस-या गटांसाठी नाईकनगर येथील महिलांनी विनंती केल्याने मुक्ता साळवे महिला समुह या नावाने वेगळा गट सुमनताई यांनी स्थापन केला .  निर्विवाद संचालन पाहून तिस-या गटासाठी डाऊरनगरच्या काही स्त्रीयांची मागणी आली.शेवटी सुमनताई तोगरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन रितसर बचत गटाची स्थापना झाली व या दोन्ही समुहाचे वेगळे कार्यकारी मंडळ नेमून कार्यभार सोपविला.
   सुमनताई यांचे पती श्री.एस.आर.तोगरे हे महाराष्ट्र शासन पुरस्कृत, समाज सेवक असल्याने त्यांच्या खांद्याला खांदा देऊन औषधे दान, कपडे दान, शाल्यय साहित्य दान,गरीब गरजूंना धान्य दान इ. उपक्रमात महाराष्ट्राच्या २५ जिल्ह्यातील ९१ सरकारी रुग्णालयात व ४० सामाजिक संस्थाना १,६०,१७,३००/- रूपये किंमतीचे औषधे दान केले आहे.नाशिक,ठाणे, पालघर,रायगड, मुंबई येथील गरीब गरजूना कपडे दान तशेंच शालेय साहित्य रायगड,पालघर येथील काही आश्रम शाळेत दान दिले आहे.प्रसंगाचे फोटो, प्रसिद्ध बातम्या व प्रमाणपत्र संग्रही आहेत.
   सुमनताई तोगरे यांच्या या अलौकिक कार्याची ओळख व्हावी व हा वसा कुणीतरी घ्यावा हीच मनिषा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जॉय सामाजिक संस्थेकडून १०० गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात ; किराणा किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप, प्रेरणादायी संवादातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची नवी उमेद

मुंबई : समाजातील वंचित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा आणि शिक्षणाची नवी उमेद जागविण्याचा सुंदर उपक्रम जॉय सामाजिक ...