सौ पूनम गणेश पाटेकर या उरण मधील म्हातवली येथे राहतात.त्यांचे मूळ गाव महाड असून लग्नानंतर त्या उरण मध्ये आल्या.गेली 12 वर्ष त्या उरण मध्ये वास्तव्यास आहेत. लग्ना अगोदर st Xavier's mahad येथे शिक्षिका म्हणून काम करत होत्या.लग्नानंतर उरण हे शहर शिपिंग संबंधित असल्यामुळे त्यांनी shipping and logistics मध्ये डिप्लोमा केला.आणि सीबीडी येथे crest container या कंपनीत काम करत होत्या.परंतु काही कौटुंबिक कारणास्तव ती कंपनी त्यांना सोडावी लागली.मग त्यांनी ECCEd हा कोर्स करून उरण मधील ues स्कूल मध्ये 5 वर्ष शिक्षिका म्हणून काम केले.परंतु नोकरीत त्यांचे मन रमत नव्हते.त्यांनी शाळेचा राजीनामा दिला आणि मुलांसाठी त्यांनी घरीच राहणे पसंद केले. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे.परंतु नुसते घरी बसून त्यांना करमत नव्हते मग त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू करायचे ठरवले.दोन वर्षाच्या lockdown मध्ये त्यांनी ऑनलाइन बिझनेस चालू केला.खूप छान प्रतिसाद मिळाला.परंतु काही तरी वेगळे केले पाहिजे असे त्यांना सतत वाटत होते.म्हणून मग त्यांच्या महाड येथील मिनाक्षी शिंदे या मैत्रिणीने त्यांना sanitary napkins व्यवसाय बद्दल सांगितले.
Kallisto hygin pvt limited ही एक भारतीय कंपनी आहे जी sanitary napkins बनवते.हे sanitary napkins organic आहेत. केमिकल आणि प्लास्टिक विरहित आहेत ज्या मुळे महिलांना मासिक पाळीत कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत आणि यातील anion चीप मुळे मासिक पाळीत होणारे त्रास आणि आजार या मुळे कमी होतात.हा यांचा स्वानुभव आहे.त्या मुळे हे sanitary napkins अत्यंत कमी दरात महिलांना विकून महिलांना या त्रासातून मुक्त करू असा मनाशी निर्धार केला.
मग त्यांनी हा व्यवसाय सुरू केला सुरुवातीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता परंतु त्यांनी कधीच आशा सोडली नाही.गेली तीन वर्षांपासून हा व्यवसाय त्या करत आहेत.मग आपण स्वतः महिलांपर्यंत पोहोचले पाहिजे असे त्यांनी ठरवले.मग त्यांनी "sanitary napkins जागरूकता आणि महिलांना व्यवसायाची संधी" या कार्यक्रमांतर्गत गावोगावी, विविध area किंवा महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात महिलांना मासिक पाळी विषयी तसेच sanitary napkins चे महत्व त्या पासून होणाऱ्या विविध आजार विषयी माहिती देण्यास सुरुवात केली.त्यांना सामाजिक कार्याची खूप आवड असल्यामुळे त्यांनी आता पर्यंत नागाव, म्हतवली,खोपटा, भेंडखळ,सोनारी,मोरा फणस वाडी,भोवरा,उरण नगर परिषद आयोजित कार्यक्रमात, फुंडे येथील शाळेत डेमो मार्फत बाजारातील उपलब्ध पॅडस आणि FOR HER ORGANIC SANITARY NAPKINS यातील फरक दाखवून महिलांना चांगले pads वापरून कसे आपले आरोग्य चांगले ठेवता येईल या बाबत मार्गदर्शन त्या करत आहेत.त्याच बरोबर healthy lifestyle कसे जगावे.घरगुती पदार्थ खाऊन आणि व्यायाम द्वारे आपले वजन कसे कमी करता येते.या बाबत देखील मार्गदर्शन त्या करतात.या कामात त्यांची मैत्रीण सौ हेमा घरत आणि डॉक्टर सौ सविता डेरे या देखील याच्या सामाजिक कामात साथ देत आहेत. कमीत कमी गुंतवणूक करून आपला व्यवसाय कसा चालू करू शकतो या बाबत देखील त्या महिलांना मार्गदर्शन करून आपल्या पायावर उभे राहण्यास सक्षम करत आहेत .आज जवळ जवळ 25 महिलांना व्यवसाय चालू करून दिला आहे.
सौ पूनम या UIDAI ची supervisor ची परीक्षा देखील पास झाल्या आहेत.तसे CSC ची परीक्षा देऊन पॅन कार्ड,आधार कार्ड,शॉप ॲक्ट लायसन,उद्यम registration, food licence अशी शासकीय ऑनलाइन कामे देखील करतात.तसेच त्या उत्तम गायिका देखील आहेत. महाड आयडॉल हा किताब देखील 2008 साली त्यांना मिळाला आहे. तसेच सलग तीन वर्ष द्रोणागिरी आयडॉल हा किताब देखील पटकावला आहे.उरण मधील हौशी आणि नवोदित गायक कलाकारांना एकत्र करून "सुर उरण करांचा" असा एक ग्रुप तयार केला आहे.नुकताच त्यांनी दिवाळी पहाट चा कार्यक्रम केला.आणि येत्या 12 मार्च ला भारत रत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यादो का सफर नावाचा कार्यक्रम देखील त्यांनी आयोजित केला आहे.या सर्व कामगिरीत त्यांचा पती गणेश आणि मुलगी दुर्वा यांची मोलाची साथ त्यांना कायम मिळत आहे.या दोघांमुळेच मी इथवर आली आहे असे त्या सांगतात.
एक यशस्वी उद्योजिका होऊन आपले नाव तसेच कुटुंबाचे नाव मोठे करावे आणि महिलांना मासिक पाळीतील त्रासातून मुक्त करावे आणि प्रदूषण विरहित सॅनिटरी नॅपकिन्स वापरून वातावरण देखील प्रदूषण मुक्त करावे असे त्यांचे उद्दिष्ट्य आहे.या कामासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा