मुंबई: सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबई, यांच्या वतीने, वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दि १६ एप्रिल २०२२ रोजी, दादर (पश्चिम) येथे, संपन्न होणार आहे. या संमेलनात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, विरार, पनवेल स्थित मराठा समाजातील विद्यार्थी चा गुणगौरव करण्यात येणार आहे.
सन २०२०-२०२१ या वर्षात पदवी व द्विपदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनी त्यांच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत, सोबत मुंबईतील पत्ता, गावचा पत्ता, व मोबाईल क्रमांकासह, दादर पश्चिम येथील "सावंतवाडी संस्थान मराठा समाज, स्टार मॉल, ३रा मजला, न.चि. केळकर मार्ग, शिवाजी मंदिर शेजारी, दादर (पश्चिम), मुंबई ४०० ०२८ या पत्यावर दि. ३१ मार्च २०२२ पूर्वी पाठवाव्यात अथवा सोमवार सोडून , सायंकाळी ४ ते ७ या वेळेत संस्थेच्या कार्यालयात पाठवाव्यात असे संस्थेचे चिटणीस - नरेंद्र सावंत यांनी आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा