आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२६

महिला व बाल विकास विभाग(​महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर तिरंगा २०२६” अभियानांतर्गत आयोजित उपक्रमाचा व ओएससी (OSC) माहिती सत्राचा यशस्वी समारोप

मुंबई : महिला व बाल विकास विभाग(​महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र चेंबूर, मुंबई उपनगर (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर तिरंगा २०२६” अभियानांतर्गत आयोजित उपक्रम व ओएससी (OSC) माहिती सत्राचा कार्यक्रम नुकताच यशस्वी रित्या पार पडला. 
​    त्यानुसार दि.१४ ऑगस्ट २०२६ रोजी  माता रमाबाई आंबेडकर म्युनिसिपल हॉस्पिटल, चेंबूर येथील डॉक्टर्स, नर्स व इतर वैद्यकीय कर्मचारी तसेच स्त्रीमुक्ती संघटना (कौटुंबिक सल्ला केंद्र), चेंबूर चे कर्मचारी आणि दिलासा केंद्र, मुलुंड येथे भेट देऊन तेथील अधिकारी, कर्मचारी व उपस्थितांना 'हर घर तिरंगा' अभियानाबाबत तसेच सखी वन स्टॉप सेंटर (OSC) च्या सेवा व कामकाजाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
      दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी  स्वातंत्र्य दिनानिमित्त पुरुष भिक्षेकरी गृह, महिला भिक्षेकरी गृह व सखी एक थांबा केंद्र (OSC), चेंबूर येथे राष्ट्रध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सदर प्रसंगी भिक्षेकरी गृहातील भिक्षेकरी, शासकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग व स्टाफ उपस्थित होते. या सर्वांना राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला तसेच सखी एक थांबा केंद्राच्या (OSC) कामकाजाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
​      तसेच महिला व बालकांमध्ये जनजागृती होण्याच्या उद्देशाने 
अभियानादरम्यान महिला, बालके व लाभार्थी यांना राष्ट्रध्वजाचे महत्त्व, राष्ट्रध्वजाचा सन्मान, राष्ट्रीय एकात्मता व देशभक्ती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच “हर घर तिरंगा २०२६” अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
​     तसेच अभियानादरम्यान नागरिकांना “हर घर तिरंगा” उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तिरंग्यासोबत छायाचित्र (Tiranga Selfie) घेऊन अभियानात सहभाग नोंदविण्याबाबतही जनजागृती करण्यात आली.
      ​वरीलप्रमाणे सखी एक थांबा केंद्र (वन स्टॉप सेंटर), चेंबूर यांच्या वतीने “हर घर तिरंगा २०२६” अभियानांतर्गत विविध देशभक्तीपर, जनजागृतीपर व राष्ट्रभक्तीपर उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आले आहेत.​सदर कार्यक्रमांमधून डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, संस्थांचे कर्मचारी, नागरिक, महिला, बालके, भिक्षेकरी गृह लाभार्थी व रुग्ण यांच्यामध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर व राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

महिला व बाल विकास विभाग(​महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर तिरंगा २०२६” अभियानांतर्गत आयोजित उपक्रमाचा व ओएससी (OSC) माहिती सत्राचा यशस्वी समारोप

मुंबई : महिला व बाल विकास विभाग(​महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र चेंबूर, मुंबई उपनगर (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर ...