आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १३ मार्च, २०२२

नमन लोककला संस्थेबरोबर लवकरच बैठकीचे आयोजन.मा.आमदार-भास्कर जाधव यांनी केले आश्वासित ; नमन लोककला संस्थेच्या वतीने मा.आमदार.भास्कर जाधव जाधव यांचे अभिनंदन!

निवोशी/गुहागर-( उदय दणदणे)-नमन लोककला संस्था (भारत) संलग्न समस्त तालुका शाखा यांच्यावतीने  नमन लोककला व लोककलावंत प्रती सदनामधे मांडलेले महत्वपूर्ण प्रश्न व त्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने मंत्रीमहोदय यांनी दिलेली ग्वाही या बाबत नमन लोककला संस्थेचे अध्यक्ष:श्री रवींद्र मटकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नमन लोककलावंतांच्या उपस्थितीत, दिनांक-९ मार्च २०२२ बुधवार रोजी मा.आमदार:श्री भास्कर जाधव साहेब यांची शिवसेना भवन दादर- मुंबई येथे भेट घेऊन मनस्वी आभार व्यक्त करत अभिनंदन केले.

   महारष्ट्र शासनाच्या व सांस्कृतिक विभागाच्यावतीने इतर प्रांतातील व विभागातील लोककलांना व लोककलावंताना शासनाच्या मानधन योजना, महोत्सव, व सांस्कृतिक मंत्रालया अंतर्गत असणाऱ्या आश्रय योजनांचा लाभ मिळत असतो. सदरचा लाभ व फायदे आपल्या नमन या कोकणातील लोककलेला व अन्य कोकणातील लोककलांना मिळावे यासाठी मा.आमदार: श्री भास्कर जाधव साहेब यांनी  विधानसभेत आत्मीयतेने अगदी पोटतिडकीने लोककलावंताच्या व्यथा लक्षात घेऊन कोकणातील लोककलावंतानाही शासकीय योजनांचा लाभ मिळावा करीता प्रश्न मांडले होते.त्या मांडलेल्या प्रश्नावर अगदी सकारात्मक मंत्रीमहोदय यांनी प्रतिसाद देत सदर प्रकरणी योग्य पध्दतीने मार्गदर्शक तत्त्वांचा विचार आपल्या सोबत पुढील बैठकीत केला जाईल व कोकणच्या नमन या लोककलेला न्याय दिला जाईल असे मंत्री महोदय सांस्कृतिक  कार्यमंत्री सन्माननीय श्री अमित देशमुख साहेब यांनी स्पष्ट संकेत दिले. 

 या साऱ्या बाबी आपल्यामुळे घडून आल्या त्या बद्दल  मा.आमदार.श्री भास्कर जाधव साहेब यांचे नमन लोककला संस्थेच्या वतीने अध्यक्ष- श्री रवींद्र मटकर यांनी आभार मानले.पुढे ही आम्हाला आपले सहकार्य मिळावे असा विश्वास व्यक्त करत नमन लोककलेच्या बाबत सदर प्रकरणी पुढील कार्यवाही होण्याच्या अनुषंगाने व विधिमंडळ सदस्यांची बैठक होईल त्यावेळी काही मार्गदर्शक तत्त्व विचारात घेताना या लोककलेच्या संघटनेतील अभ्यासकांना विचारात घ्यावे. जेणेकरून या लोककलेच्या बाबत विधेयक मंजूरीसाठी आणताना त्याच अगोदर या लोककलेतील बारकावे व अडी अडचणी, तसेच इतर बाबींचा विचार होण्याच्या दृष्टीने  आपल्या सोबत सविस्तर चर्चा होणं गरजेचं आहे.  

 पुढील काळावधीत लवकरात लवकर आपल्या सोबत सदर संस्थेचे पदाधिकारी व या लोककलेतील अभ्यासक यांची एक आपल्या उपलब्धतेनुसार बैठक व्हावी अशी विनंती संस्थेच्या वतीने करण्यात आली. सदर विनंतीला मा. आमदार -श्री भास्कर जाधव साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत.लवकरच शिमगोत्सवा नंतर मुबंईत आपण बैठक आयोजित करून सदर बैठकीत सविस्तर सर्वसमावेशक चर्चा करून सर्व प्रश्न व लोककलेतील बारकावे लक्षात घेऊन आलेल्या सूचनांच स्वागत करून नमन लोककलेला आणि लोककलावंताना आपण परिपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वाशीत केले. सदर चर्चा भेटीकरीता नमन लोककला संस्थेचे अध्यक्ष-श्री रवींद्र मटकर, ( राजापूर) सचिव- श्री सुधाकर मास्कर ( गुहागर)  उपाध्यक्ष- श्री रमाकांत जावळे ( चिपळूण) का.सदस्य-श्री सुभाष बांबरकर (रत्नागिरी ) का.सदस्य- श्री उदय दणदणे (गुहागर) श्री सुरेश मांडवकर (राजापूर) श्री प्रशांत भेकरे( गुहागर) श्री पिंकेश बापर्डेकर ( राजापूर) आदी पदाधिकारी, सदस्य, कलाकार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

महिला व बाल विकास विभाग(​महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर तिरंगा २०२६” अभियानांतर्गत आयोजित उपक्रमाचा व ओएससी (OSC) माहिती सत्राचा यशस्वी समारोप

मुंबई : महिला व बाल विकास विभाग(​महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र चेंबूर, मुंबई उपनगर (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर ...