मुलुंड (शेखर भोसले )-हजारो विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि आयआयटीयन बनण्याचे स्वप्न साकार करण्यात मदत करण्यात तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत आवश्यक त्या चाचण्या घेवून तयार करण्यात अग्रेसर असलेल्या आकाश बायजू'जच्या नवीन क्लासरूम केंद्राचे उद्घाटन मंगळवार दि १५ रोजी, मुलुंड पश्चिम येथील कप्पिश बिज्नेस सेंटर येथे झाले. ६ वर्गखोल्या तसेच एकूण ६०० विद्यार्थी बसण्याची सोय असलेल्या मुंबई शहरातील या नवव्या क्लासरूम सेंटरचे उद्घाटन आकाश बायजू'जचे प्रादेशिक संचालक अमित सिंग राठौर आणि कंपनीच्या इतर वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
'आकाश बायजू'ज त्याच्या केंद्रांच्या पॅन-इंडिया नेटवर्कद्वारे देशभरात दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. आमच्या शैक्षणिक सामग्रीची गुणवत्ता आणि आमच्या शिकवण्याच्या पद्धतींची परिणामकारकता, विद्यार्थ्यांच्या निवडींच्या संख्येवरून दिसून येते, त्यामुळेच पदवीपूर्व वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी पात्र ठरू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आकाश बायजू'ज हा एक सर्वोच्च पर्यायांपैकी एक ठरत आहे. मुलुंडमधील आज उद्धाटन करण्यात आलेले नवीन क्लासरूम केंद्र ऑलिम्पियाड्स पास करून आणि डॉक्टर, आयआयटीयन बनण्याची तयारी करणाऱ्या स्थानिक विद्यार्थ्यांसाठी मोठे वरदान ठरणार आहे. मुलुंड येथे पहिले क्लासरूम सेंटर उघडताना तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा ठसा वाढवताना खूप आनंद होत असून आमच्या राष्ट्रीय नेटवर्कमध्ये या शाखेचा समावेश करणे, तंत्रज्ञान-सक्षम प्रणाली वापरून, प्रमाणित दर्जेदार अध्यापन, आधुनिक पायाभूत सुविधा आणि संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अनुकूल वातावरण प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे आकाश बायजू'जचे व्यवस्थापकीय संचालक आकाश चौधरी यांनी या केंद्राच्या उद्धाटनसमयी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा