आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १५ मार्च, २०२२

ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे / आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची अप्पासाहेब धर्माधिकारी सदिच्छा भेट

अंबरनाथ / अविनाश म्हात्रे :-  ज्येष्ठ निरुपणकार तिर्थस्वरूप आदरणीय गुरुवर्य पद्मश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्यासह आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सदिच्छा भेट घेतली,यासमयी आदरणीय अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे चिरंजीव श्री.सचिन दादा धर्माधिकारी आणि श्री.राहुल दादा धर्माधिकारी यांची अभिनंदानासाठी सदिच्छा भेट घेतली.

आदरणीय श्री.सचिन दादा धर्माधिकारी यांना नुकतीच युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट कडून मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. यानिमित्ताने त्यांचे विशेष अभिनंदन केले. 
याप्रसंगी आमदार श्री. भरत गोगावले, श्री. महेंद्र दळवी, रायगड दक्षिणचे युवासेना जिल्हा अधिकारी विकास गोगावले आणि शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

महिला व बाल विकास विभाग(​महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर तिरंगा २०२६” अभियानांतर्गत आयोजित उपक्रमाचा व ओएससी (OSC) माहिती सत्राचा यशस्वी समारोप

मुंबई : महिला व बाल विकास विभाग(​महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र चेंबूर, मुंबई उपनगर (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर ...