आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ७ मार्च, २०२२

श्री राम मंदिर लेप्रसी कॉलनी महिला मंडळ यांच्या तर्फे बचत गटांचे 8 मार्च 2022 उद्घाटन

उल्हासनगर / अविनाश म्हात्रे :- 8 मार्च महिला दिवसाचे औचित्य साधून दिनांक 8 मार्च 2022 दुपारी एक वाजता श्री राम मंदिर लेप्रसी कॉलनी वॉटर सप्लाय ऑफिस उल्हासनगर 4 इथे खालील कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची  माहिती पुढील प्रमाणे तीन नवीन बचत गट तयार करून बचत गटांचे बोल्ट बनवून त्यांचे उद्घाटन.  1) आद्य शिक्षिका फातिमा शेख महिला बचत गट 2) कै.पूज्य (आईसाहेब) पार्वतीबाई पटवर्धन महिला बचत गट 3) अंतराळ वैज्ञानिक सुनीता विल्यम्स महिला बचत गट याप्रमाणे तीन नवीन बचत गट निर्माण होणार आहेत.
तरी आपण या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावून आमच्या लेप्रसी कॉलनी ला आपला अमूल्य वेळ देऊन मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती श्री राम मंदिर लेप्रसी कॉलनी महिला मंडळ यांच्या तर्फे करण्यात येत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पवईतील आंबेडकरी चळवळीतील युवा तडफदार धाडसी नेतृत्व हरपले

पवई (प्रतिक कांबळे): पवईतील आय.आय‌‌.टी संकुलात कामास असलेले आंबेडकरी विचारधारेचे युवा तडफदार धाडसी नेतृत्व सदैव समाजकार्य करण्यासाठी तत्पर अ...