आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

भाजप अंबरनाथ शहराध्यक्ष यांची महाशिवरात्रीत प्राचीन शिवमंदिरात दर्शन मिळावे यासाठी राज्यपालांकडे मागणी

अंबरनाथ / अविनाश म्हात्रे :-  अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते. कोरोना संकट काळात सलग दोन वर्ष महाशिवरात्रीची यात्रा बंद करण्यात आली होती, मात्र यंदा कोरोनाचा दर कमी झाल्याने किमान भाविकांना दर्शनाची सोय मंदिरात उपलब्ध करून द्यावी यासाठी भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित गुलाबराव  करंजुले-पाटील यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी साहेब यांची भेट घेऊन या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. यावेळी झालेल्या चर्चेत अभिजित गुलाबराव करंजुले-पाटील यांनी प्राचीन शिवमंदिराचा इतिहास आणि त्याची आख्यायिका राज्यपालांना सांगितली, तसेच महाशिवरात्रीला प्राचीन शिवमंदिरात भाविकांना दर्शन उपलब्ध करून देण्यासाठी निर्णय होणे गरजेचे असून भाविकांच्या श्रद्धेच्या आड शासनाचे नियम येणार नाहीत याची काळजी घेण्याची मागणी त्यांनी केली. सलग दोन वर्ष भाविकांना महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता आलेले नाही, त्यामुळे किमान यंदाच्या वर्षी भाविकांना प्राचीन शिवमंदिरात दर्शनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी शासनाला निर्णय घेण्यासंदर्भात सूचना कराव्यात अशी मागणी करंजुले यांनी केली. 

  त्याचबरोबर अंबरनाथ शहरातील विविध राजकीय, सामाजिक व इतर अनेक विषयावर राज्यपाल साहेब  यांच्याशी शहराध्यक्ष अभिजित करंजुले-पाटील  यांनी चर्चा केली, यावेळी शहराध्यक्ष अभिजीत गुलाबराव करंजुले-पाटील याच्यासह संघटन सरचिटणीस दिलीप कणसे,व्यापारी अध्यक्ष खानजि धल,जिल्हा सचिव संतोष शिंदे व विश्वासराव निंबाळकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाली भाषेत मुनी म्हणजे मन आणि वर म्हणजे राजा ज्याने स्वतःचा मनाला जिंकले आहे तो मनाचा राजा झाला अशी जगातील एकमेव व्यक्ती बुद्ध होय - सुगंध भिवा कदम

मुंबई  (रामदास धो. गमरे) तथागत गौतम बुद्धांच्या समता, शांती, मैत्री या संदेशाची जगातील सर्वच विद्वानांना जाणीव झाली म्हणूनच ब्रह्मदेशातील रं...