आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

शिवजयंती निमित्त मोफत १८० लिटर वऱ्हाडी गुळाचा चहा वाटून कौतुकास्पद समाजसेवा

पनवेल  / अविनाश म्हात्रे :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साही व आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली.

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ठीक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शिवरायांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पनवेल शहरातील बसस्थानका समोरील चर्च बाजूला असलेल्या वऱ्हाडी गुळाचा चहा व सृष्टी फुडस ग्रुपच्या वतीने सर्व नागरिकांना मोफत चहाचे वाटप करण्यात आले. वऱ्हाडी गुळाचा चहा ग्रुपने हा अनोखी व स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल पनवेलकर मनापासून कौतुकास्पद आभार,आशीर्वाद व समाधान व्यक्त करत आहेत. वर्ऱ्हाडी गुळाचा चहा यांच्या संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये १४ शाखा असून पनवेल परिसरात पनवेल, कळंबोली, कामोठे या ठिकाणी तीन शाखा आहेत. या तीनही शाखांमध्ये आज सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने सर्व नागरिकांना मोफत चहाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती वऱ्हाडी गुळाचा चहा च्या ग्रुपच्या वतीने प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. सकाळपासून येणाऱ्या कुठल्याही व्यक्तींकडून  पैसे न घेता मोफत चहा वाटप केल्याने चहा पिणाऱ्यांनी
   अत्यंत समाधान व्यक्त करत वऱ्हाडी गुळाचा चहा या समूहाचे आभार व्यक्त केले. गेली दोन वर्षांपासून वऱ्हाडी गुळाचा चहा समूहाचे मालक क्षितीजा सिद्धेश भिसे ,तुकाराम हांगे, राजेन्द्र खाडे, नितीन खाडे, आदींनी हा उपक्रम राबवित असल्याने पनवेलकरांनी कौतुकास्पद समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाली भाषेत मुनी म्हणजे मन आणि वर म्हणजे राजा ज्याने स्वतःचा मनाला जिंकले आहे तो मनाचा राजा झाला अशी जगातील एकमेव व्यक्ती बुद्ध होय - सुगंध भिवा कदम

मुंबई  (रामदास धो. गमरे) तथागत गौतम बुद्धांच्या समता, शांती, मैत्री या संदेशाची जगातील सर्वच विद्वानांना जाणीव झाली म्हणूनच ब्रह्मदेशातील रं...