आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

इतका उशीर का ?

 बहुचर्चित ईडीने मंगळवारी मुंबई आणि ठाण्यात अडरवर्ल्डशी संबंधित १० ठिकाणी छापे मारले आणि खळबळ उडवून दिली.मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद विरुद्ध एमआयएने एफआयआर दाखल केला त्याच्याच अनुषंगाने ईडीने कारवाई केली.आश्चर्य याचेच वाटते की नेहमीच इतर नेत्यावर त्वरित कारवाई करणारी ईडी बॉम्बस्फोट होऊन तब्बल ३९ वर्षे झाल्यावर जागी कशी झाली ? दाऊद हा कुख्यात अडरवर्ल्डशी संबंधित आहे आणि त्याची मालमत्ता येथे आहे हे जगजाहीर असताना इतक्या उशिरा कारवाई करणे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविण्यासारखे आहे.दाऊदला पकडून भारतात आणू ही घोषणा हवेतच विरली की काय ? 


-अरुण पां. खटावकर
लालबाग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पवईतील आंबेडकरी चळवळीतील युवा तडफदार धाडसी नेतृत्व हरपले

पवई (प्रतिक कांबळे): पवईतील आय.आय‌‌.टी संकुलात कामास असलेले आंबेडकरी विचारधारेचे युवा तडफदार धाडसी नेतृत्व सदैव समाजकार्य करण्यासाठी तत्पर अ...