आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

शिवजयंती निमित्त चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

उरण (विठ्ठल ममताबादे )-उरण तालुक्यातील करंजा येथील रा.जि.प. प्राथमिक शाळा कोंढरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त माजी विद्यार्थी इयत्ता ७ वी वर्ष २०१०-११ यांच्या वतीने प्राध्यापक आणि शाळा कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धचे आयोजन  करण्यात आले होते. या स्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने सहभाग घेतला होता. तसेच शाळा कमिटी व शिक्षकांनी सुद्धा सहभाग दाखवला. 

   उत्तीर्ण स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय  तसेच उत्तेजनार्थ असे चित्रकलेचे साहित्य व आकर्षक ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आले.सध्याची परिस्थिती पाहता अनेक माजी विध्यार्थी संघ वेगवेगळ्या ठिकाणी व पर्यटन स्थळी जाऊन आपले गेट टू गेदर सारखे कार्यक्रम करत असतात.मात्र सदर माजी विद्यार्थ्यांनी आगळा वेगळा उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावी या उद्देशाने माजी विद्यार्थी इयत्ता ७ वी वर्ष २०१०-११ यांनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. याप्रसंगी शाळेचे प्रा. मच्छिंद्र म्हात्रे यांनी आपल्या संभाषणातून अश्याच प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम माजी विद्यार्थ्यांकडून व्हावे असे मत मांडले.चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे शिक्षकवर्ग आणि शाळा कमिटीने माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आज गिरगावात रंगणार कलगी-तुऱ्याचा जंगी सामना !

मुंबई( दिपक कारकर):   कोकणच्या समृद्ध लोकपरंपरेचे वैभव असलेली कलगी-तुरा (शक्ती-तुरा/जाखडी) ही पारंपरिक लोककला पुन्हा एकदा मुंबईकरांच्या भेटी...