आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

देशाच्या सुरक्षेतील DCS च्या प्रशिक्षणात मुंबईच्या प्रशांत चाहर यांची निवड

मुंबई(शांताराम गुडेकर)   रेल्वे पोलीस बल ( आरपीएफ)  मध्ये कार्यरत असलेले लोणावळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सिंह यांचे धाकटे चिरंजीव प्रशांत रणजितसिंह चाहर यांची CDS च्या प्रशिक्षण मध्ये निवड झाली आहे. प्रशांत सिंह चाहर यांनी मुंबई विद्यापीठातून २०२० मध्ये पदवीधर झाल्यानंतर देशाच्या सुरक्षेत सामील होण्याच्या दृष्टीने कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस २०२१ ची परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले. ही परीक्षा कोरोना काळात सर्व कोचिंग क्लासेस इन्स्टिट्यूट बंद असल्यामुळे प्रशांत यांनी अहोरात्र घरी च सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून हे यश मिळवले. कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस परीक्षातील ऑल इंडिया रँकिंगमध्ये ५३ क्रमांक तर एअर फोर्स अकॅडमी परीक्षा मध्ये ११ क्रमांक पटकावला आहे. यातील विविध अभ्यासक्रमात यश मिळवल्यानंतर त्यांची CDS च्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली असून प्रशांत हे उत्तराखंड च्या डेहराडून येथे दोन वर्षाचे प्रशिक्षण घेण्यासाठी २० जानेवारी ला रवाना होणार आहेत. २०२३ मध्ये DCS चे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण करून देश सेवेत रुजू होतील. प्रशांत सिंह चाहर यांची देशभरातून CDS च्या प्रशिक्षण मध्ये निवड झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्वत्र त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. प्रशांत च्या निवडीनंतर वडील रणजित सिंह यांचे ही मित्रमंडळी व आपल्या अधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आदिवासी पाड्यावर बालदिन साजरा

मुंबई: कांजूरमार्ग पूर्व येथील एक सेवाभावी संस्था यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये जागतिक बालदिन साजरा केला ...