चौकशीला उपस्थित समिती समोर ग्रामस्थांनी आणले अनेक विषयी उजेडात ; चौकशी दरम्यान बोरवेल ब्लास्टिंग चे व्हिडिओ फोटो अनेक पुरावे केले सादर
कोकण (शांताराम गुडेकर)- संगमेश्वर तालुक्यातील तलेकांटे -वांद्री- परिसरातील लोकांना होत असलेल्या क्रेशरवाल्यांच्या त्रासा बद्दल तलेकाटे येथिल ग्रामस्थ यांना नाहक त्रास होत होता. क्रेशरवाल्यांच्या बेबनशाहि विरोधात सामाजिक कार्यकर्ते व नवनिर्मिती फाउंडेशन या संघटनेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांच्या नेतृत्वाखाली देवरुख तहसीलदार समोर गेली तीन दिवस उपोषण सुरु होते.यावेळी ग्रामस्थांच्या नुकसान विषयाची आणि ती सर्व विषयाचे सखोल चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार सुहास थोरात यांनी एक समिती गठीत करून नायब तहसीलदार यांच्या देखरेखीखाली चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे तळेकांटे येथील गावात येऊन सुमारे 35 ते 40 कुटुंबांमध्ये जाऊन संबंधित समितीने नायब तहसीलदार श्री गोताड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली.
या चौकशीच्या वेळी नायब तहसीलदार यांनी प्रत्येकाच्या घरात जाऊन घरांची पाहणी केली त्या वेळेस सुमारे 30 ते 40 घरांना प्रत्यक्षात तडे गेल्याचे निदर्शनास आले तसा अहवाल नायब तहसीलदार यांनी सादर करणार असल्याचे सांगितले आहे त्याचप्रमाणे अनेक घरांची पाहणी करत असताना या वेळेस होणारे बोललास ती पाण्याचा विषय पडणाऱ्या बसणारे हादरे आणि ध्वनी प्रदूषण डांबर प्लांट मध्ये होणारे प्रदूषण अनेक विषयाचे पुरावे सहित तेथील ग्रामस्थांनी रमजान गोलंदाज यांनी समितीसमोर उजेडात आणले. त्या ठिकाणी होणारी बोरवेल ब्लास्टिंग आणि डांबर प्लांट याचे जीपीएस लोकेशन सहित व्हिडिओ त्यामध्ये टाइमिंग, तारीख या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे ते पुरावे नायब तहसीलदार यांच्या समोर सादर करण्यात आले. यावेळी लोकांना होत असलेल्या त्रासाबद्दल अधिकारीही चांगलेच चिंतेत पडले होते त्यावेळेस लोक मांडत असलेला आपल्या समस्या आणि निराशा हे पाहून मन भरून येत होते. तळेकांटे चीतक वाडी येथील ग्रामस्थांचे यावेळी लेखी जबाब नोंदवून घेण्यात आले त्यामध्ये बोरवेल ब्लास्टिंग,डांबर प्लांट चा होणारा प्रदूषण,ध्वनी प्रदूषण,वृक्षतोड, ब्लास्टिग मुळे होणारे मोठमोठ्या हादरे रात्रभर अपरात्र सुरू असताना क्रेशर चा आवाज होणारे धुळीमुळे प्रदूषण सप्तलिंगी नदीवर टाकण्यात आलेला अनधिकृत ब्रिज, रस्त्यांची केलेली दुरावस्था,पाण्याची समस्या असे अनेक समस्यांचे गाराने समितीसमोर मांडण्यात आले.यावेळी रमजान गोलंदाज यानी आपल्या जबाबात खालील विषय नमूत केल्या आहेत. त्यामध्ये .ATS मशीनच्या माध्यमातून क्रेशरचालकांच्या उतखननची मोजणी, सप्तलिंगी नदीत टाकलेल्या पुलाच्या तोडण्याकामी चौकशी करणे,तडे गेलेल्या घरांचे स्टक्चरल ऑडिट, सी. सी. टी. व्ही. कॅमेरा बसवणे, दिलेल्या परवानगी प्रमाणे क्रेशर सुरु नसून नियमांचे उल्लंघन केल्या कारणी चौकशी,ब्लास्टिंग संदर्भात निर्णय देणे, वाडीत जाणाऱ्या रस्त्या बाबत चौकशी करणे, उक्षी बौद्धवाडी - मुस्लिमवाडी- चर्मकारवाडी आदी वडिमध्ये बशीर वाडिया क्रेशरचा त्रासा बाबत चौकशी करणे, असे अनेक विषय सांगण्यात आले. आलेल्या समितीने प्रत्यक्षात घरा घरात जाऊन पाहणी केल्याने ग्रामस्थांनी तहसीलदार सुहास थोरात व श्री.गोताड यांचे आभार मानले.
या चौकशीला खालील ग्रामस्थ रमजान गोलंदाज,युयुस्तु आर्ते,अनिरुद्ध कांबळे,गणपत कदम,संतोष मांजरेकर, शशिकांत मांजरेकर, दत्ताराम शिगवन, महेंद्र कादर, विनायक मांजरेकर, प्रमोद मांजरेकर,दशरथ कादर, संदीप मांजरेकर, दिनेश वेद्रे, मंगेश कादर, रवी कळबटे, प्रकाश किंजळे, रवी वेद्रे, मनोज मांजरेकर, सुरेश मांजरेकर, प्रकाश मांजरेकर, गणेश किंजळे संदीप मांजरेकर,प्रतीक मांजरेकर, अजित गवानकर तलेकांटे ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते धनाजी भांगे आदी उपस्थित होते.
[[ "समितीच्या अहवालानंतर २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावातील कुटुंबासहित उपोषणाला बसणार : रमजान गोलंदाज"]]
नुकतीच निवड केलेल्या समितीने तळेकांटे येथील स्पेशल विषयी चौकशी करून आपला अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करणार आहे.सदरील आहवाल जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सादर करणार आहेत. त्या अहवालाच्या अनुषंगाने त्याच्यावरती पुढील भूमिका स्पष्ट करणार असून येत्या 26 जानेवारीला क्रेशर विषयी न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या कार्यालयासमोर तळेकांटे येथील ग्रामस्थ कुटुंबासहित उपोषणाला बसणार असल्याचे रमजान गोलंदाज यांनी स्पष्ट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा