मुंबई : कांजूरमार्ग - भांडुप (पुर्व) येथील ओमकार मार्शल आर्ट्स अकॅडमी येथे प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंनी २७ ते ३० डिसेंबर दरम्यान पुणे येथे पार पडलेल्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत यशाला गवसणी घालताना सुवर्ण - रौप्य ,कास्य पदकांची अक्षरशः लयलूट केलेली आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या अंशुल फडके याने २ सुवर्ण पदक , १ रौप्य पदक,गौरी बोडके हिने २ सुवर्ण पदक, आयुषी नारखेडे हिने २ सुवर्ण पदक, श्रुती परब व श्रावणी पाटणकरने प्रत्येकी १ सुवर्ण पदक, अविनाश चौगुले याने १ सुवर्ण पदक,सानिया बंगेरा व दिशा पाटील ने प्रत्येकी २ रौप्य पदक, सानवी देसाई व मैत्री पाटील हिने प्रत्येकी १ रौप्य पदक, १ कांस्य पदक, राज तेली याने १ रौप्य पदक, १ कांस्य पदक, ह्रिधान सावंत १ रौप्य पदक, वेधा मोरे २ कांस्य पदक,सोहम परब १ कांस्य पदक तर ऋतिक कदम याने सहभाग असे एकूण ९ सुवर्ण, ९ रौप्य आणि ६ कांस्य पदके पटकावून आपल्या पालकांचे, प्रशिक्षकांचे तसेच महाराष्ट्र राज्याचे नावलौकिक उचांवले आहे . या सुयशाला गवसणी घालण्यासाठी खेळाडूंच्या मेहनतीसह अकॅडमी चे संस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक श्री. ओमकार शिवणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले..या यशाबद्दल खेळाडूंचे अनेकांनी अभिनंदन केले असून त्यांच्या भविष्यातील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या आहेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा