आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांचे सेंच्युरी रेयॉन कंपनी व कामगारांतर्फे उत्साहात स्वागत

कल्याण / अविनाश म्हात्रे :- कल्याण  कोरोनाच्या प्रभावामुळे गेल्या कित्येक दिवसात भेट न झाल्यामुळे तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी निमित्त साधून व कामगारांच्या आग्रहा खातर आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी, कामगार एकता कार्याध्यक्ष प्रदीप साळवी, युवा आगरी सेना प्रमुख राहुल साळवी तसेच आगरी सेना व कामगार एकताचे सर्व बडे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह कामगार व कंपनी व्यवस्थापन यांना शुभेच्छा देण्यासाठी आले असता कामगार युनियन तर्फे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
    आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी व त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत गाड्यांच्या मोठ्या ताफ्यासह सेंच्युरी रेयॉन येथे येताच फटाक्यांच्या आतिषबाजी तसेच पुष्पगुच्छ देऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले व  कामगार एकताच्या गेल्या ३५ वर्षाच्या रीती रिवाजाप्रमाणे परंपरेनुसार प्रथम कंपनीत असलेल्या हनुमान मंदिरात पूजा अर्चा करून नंतर कामगार एकता युनियन ऑफिसमध्ये कामगारांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर कंपनी व्यवस्थापन सोबत चहा पाणी कार्यक्रम व चर्चा करताना आगरी सेना ३५ वर्षे पासून कामगार व कंपनी सोबत असून दोघांमध्ये योग्य समनव्य व  समजूतदार पणा मुळे कामगार एकता युनियन वर ठेवलेला विश्वास आणि त्यामुळे शेकडो कामगारांना मिळालेला रोजगार या माध्यमातून कंपनी अविरतपणे सुरू असून राजाराम साळवी साहेबांतर्फे शुभेच्छा व धन्यवाद  देण्यात आले त्याप्रसंगी साळवी साहेबांच्या प्रेमाखातर कामगार एकता युनियन, कंपनी व्यवस्थापन चे सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच आगरी सेनेचे सर्वच बडे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या विशेष उपस्थित बद्दल साळवी साहेबांनी उपस्थितांचे आभार देखील व्यक्त केले व त्यामुळे यापुढेही आगरी सेना व कामगार एकता युनियन कामगारांच्या सदैव सोबत असेल असा एक विश्वास व एक नवीन ऊर्जा कामगारांमध्ये निर्माण झाली अशी प्रतिक्रिया कामगारांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

२६/११ च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !

मुलुंड( सतिश वि.पाटील)२६/११ च्या भ्याड हल्ल्यात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या ...