मुंबई : दास्तान फाट्याचा संग्राम यशस्वी झाला म्हणूनच भूमिपुत्र आपल्याच भूमित राहिला. हे फक्त आणि फक्त दि.बा.पाटील यांच्यामुळेच घडले आहे. असे उद्गार आगरी सेना जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ठाणकर यांनी दास्तान फाट्याचा संग्राम या पोवाड्याच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
१३ जानेवारी दि.बा पाटील यांची जयंती या निमित्ताने दि.बा.च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अजय पाटील यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.
१३ जानेवारी रोजी जासई येथे गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या दिनकर बाळू पाटील उर्फ दि. बा. पाटील यांनी शेतकरी, कष्टकरी, अन्यायग्रस्तांसाठी सातत्याने आवाज उठवला होतो. त्यांना न्याय देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई वसवण्यासाठी उरण, पनवेल, बेलापूर पट्ट्यातील हजारो एकर जमीन संपादनाचे सरकारने लक्ष ठेवले होते. त्यासाठी तिथल्या कष्टकरी, शेतकऱ्यांची मशागत करत असलेली जमीन सरकार कवडीमोल भावाने विकत घेणार होते.
त्याविरोधात १९८४ रोजी दि.बा. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी जासई गावाजवळील दास्तान फाट्याजवळ मोठं आंदोलन उभे केले. या आंदोलनात पाच शेतकरी हुतात्मे तर शेकडो जखमी झाले.
दि.बा.च्या शौर्याने दास्तान फाट्याचा संग्राम यशस्वी झाला. आणि येथील शेतकरी कष्टकऱ्यांना न्याय मिळाला. साडेबारा टक्के विकसित भूखंड तसेच शेतजमिनीला योग्य भाव हे दि.बा. पाटील यांच्या आंदोलनामुळे शक्य झाले. तेच आंदोलनाचा संग्राम अजय लिंबाजी पाटील यांनी पोवाडा द्वारे आपणासमोर आणलेला आहे. लक्ष्मी चित्राच्या यूट्यूब चॅनल तर्फे त्याची अजिता अजय पाटील यांनी याची निर्मिती केली आहे.
शिवाजी शिंदे, संजय गावडे, कोंडाजी बोडके, शैलेंद्र पाटील यांनी उत्तम अभिनय केला आहे. तर गायन जयेश कराळे यांनी केले आहे.
१३ जानेवारी दि.बा.पाटील यांची जयंती. याच दिवशी या पोवाड्याचे शानदार उद्घाटन चंद्रकांत ठाणकर यांनी करून दि.बा.च्या कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल ठाणगे तर आभार अजय पाटील यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा