आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १७ जानेवारी, २०२२

समीर खाडिलकर यांनी जेष्ठ नागरिकांना दिली मायेची उब

मुंबई(शांत्ताराम गुडेकर) -   कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता. बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्ता समीर खाडिलकरही याला अपवाद नाहीत.त्यांनी आवश्यक तेथे जी-जी गरज होती तेथे तेथे गरजेनुसार मदतीचा हात दिला. मराठी भाषा गौरव दिवसानिमिताने ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम अमृत नगर सर्कल, बंबखाना  व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांना अन्नधान्य किट देऊन मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली. यापुर्वीही माझी वसुंधरा मित्र, महाराष्ट्र हरित सेना वन विभाग महाराष्ट्र शासन सदस्य, माहिती अधिकार,पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना जनसंपर्क अधिकारी मुंबई जिल्हा,समाजसेवक समीर खाडिलकर यांनी ठाणा जिल्ह्यातील दिवा परिसरातील दिवा गणेश नगर आणि बी.आर.आर नगर येथील  गरजूंना अन्नधान्य किट देऊन मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.तर ईशान्य  मुंबईतील ३० जेष्ठ नागरिकांसह जेष्ठ पत्रकार,मुक्त पत्रकार व श्रमिक पत्रकार यांना अन्नधान्य किटचे वाटप(वाटप करताना फोटो सुध्दा न घेता) केले.आज (दि.१७ जाने.२०२२ रोजी ) थंडीचा विचार करत घाटकोपर, बंबखाना, अमृत नगर येतील रस्त्यावर रहाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना मायेची ऊब (चटई, ब्लॅकेट)सोबत तिळगुळ देत मदतीचा हात दिला.नव्या जुन्या पिढीतला बेबनाव अनेक घरातून दिसून येतो.आणि बऱ्याचदा ज्येष्ट नागरिकांच्या वाट्याला दुःख निराशा येते.आयुष्याच्या संध्याकाळी ते व्यथित होतात.ते सुखी कसे होतील हे पहाणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे मत समाजसेवक समीर खाडिलकर कायमस्वरुपी बोलताना व्यक्त करतात.ख्रिसमस, इयर एन्ड, न्यू इयर आणि गुलाबी थंडी... एकीकडं थंडीचा आनंद लुटण्यासाठी प्लान आखले जातायत तर दुसरीकडं रस्त्यावर राहणा-यांसाठी मात्र ही थंडी जीवघेणी ठरतेय.असेच काही गारठलेले संसार सावरण्यासाठी मदतीच्या ऊबदार हातांची गरज होती. ही गरज समीर खाडिलकर यांनी ओळखली आणि त्यांना मायेची ऊब दिली.

             यापुर्वीच त्याच्या सेवाभावी कार्याची दखल घेत खार पूर्व येथील "श्री स्वामी समर्थ " कृपासिंधू सामाजिक संस्था(नोंदणीकृत)अध्यक्ष सुनिल मांजरेकर,सल्लागार रविंद्र आंब्रे यांनी समीर खाडिलकर यांचा "कोविड योध्दा" सन्मानपत्र देऊन गौरव केलेला आहे.तसेच कोकण कट्टा तर्फे कोकण कट्टा सन्मान पुरस्कार -२०२१ ने नुकतेच सन्मानित केलेले आहे. तर भा.म.सेना राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश सकुंडे(संपादक- शिववृत्त),महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अँड.आनंदजी गुगळे यांनी " कोविड योध्दा" या सन्मानपत्राने गौरविले.तसेच साप्ता.धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप,पाक्षिक आदर्श वार्ताहर संपादक पंकजकुमार पाटील यांच्यासह विविध संस्था,संघटनाव वर्तमानपत्र यांनीही समीर खाडिलकर यांचा "कोविड योध्दा" सन्मानपत्रने गौरव केला आहे. समीर खाडिलकर यांना कोविड योध्दा सन्मानपत्र ,कोकण कट्टा सन्मान -२०२१ पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.शिवाय ईशान्य मुंबईतील घाटकोपर,विक्रोळी येथे गरजवंत जेष्ठ नागरिकांना मकर संक्रात चे औचित्य साधून  मायेची ऊब म्हणून चटई आणि ब्लॅकेट व तिळगुळ वाटप केल्याबद्दल अनेकांनी समीर खाडिलकर यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा व आशिर्वाद दिले.तर अमृत नगर,बंबखाना व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांकडून समीरy खाडिलकर यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असे आशिर्वादही दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...