मुंबई(शांताराम गुडेकर) ओणनवसे विभाग क्रिडा कमिटी, ता. दापोली, जि. रत्नागिरी तर्फे घाटकोपर पश्चिम येथील कम्युनिटी सेंट्रल हॉल,सी.जी.एम कॉलनी येथे रक्तदान शिबिर-२०२२ चे आयोजन आज रविवार दि.१६ जाने.२०२२ रोजी करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. एकूण ५१० रक्त बॉटल संकलन करण्यात आले.ओणनवसे विभाग क्रिडा कमिटी, ता. दापोली, जि. रत्नागिरी तर्फे
या आधीही अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून भविष्यातही समाजातील गोर-गरीब,वंचित लोकांसाठी जे जे शक्य आहे ते ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू असा मनोदय यानिमित्ताने पदाधिकारी, सदस्य यांनी व्यक्त केला.शासनाच्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टन्ससिंग ठेऊन शिबीर संपन्न झाल्याचे उपक्रम प्रमुख यांनी सांगितले व सर्वांचे आभार मानले.शिबिराला समाजसेवक शरद भावे आणि त्यांचे सहकारी यांनी भेट दिली.शरद भावे यांचा यावेळी आयोजक यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. तर काही रक्तदात्याना भेट वस्तू आणि सर्टिफिकेट देऊन गौरवही करण्यात आला.शिबिर यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष संदीप आंबेकर, उपाध्यक्ष नरेश पाते, सचिव सचिन करबेले, सह सचिव नंदकिशोर खळे, खजिनदार रुपेश मोगरे, उप खजिनदार राजेश नाचरे, मुंबई कार्यकारणी सदस्य, ग्रामीण कार्यकारणी सदस्य आणि अन्य पदाधिकारी, सदस्य व सभासद आदींनी खूप मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा