आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

राष्ट्रीय युवा दिनी राष्ट्रीय सुवर्णपदक विजेतीचा सन्मान व विविध स्पर्धा संपन्न

बदलापूर : ट्रॅम्पोलीन या  खेळात राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या व येत्या काळात या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी पेलण्यास सक्षम असलेल्या कु.राही पाखले यांना लाडशाखीय वाणी समाज मंडळ कुळगांव-बदलापूर संचलित कलामंचच्या अध्यक्षा सौ.पल्लवी देव,  समाज मंडळाचे अध्यक्ष मनोहर पाटकर, कलामंच सदस्या सौ.मिना फागणेकर, सौ.वंदना वाणी, सौ.नेरकर तसेच  महिला मंडळ अध्यक्षा सौ.रत्नमाला वाणी यांनी १२ जानेवारीस त्यांच्या डाेंबिवली येथील निवासस्थानी जाऊन भेट दिली आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त मानपत्र प्रदान केले.
      राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त वेशभूषा आणि वक्तृत्व स्पर्धा  देखील याच दिवशी रात्री ८.३० वाजता लाडशाखीय वाणी समाज मंडळ कुळगांव-बदलापूर संचलित कलामंचच्या विद्यमाने आयोजित करण्यात आल्या.  स्पर्धेत विविध वयोगटातील एकूण ३६ स्पर्धकांनी सहभाग घतला होता. त्या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे ः
गट क्रमांक १ वेशभूषा स्पर्धा निकाल प्रथम क्रमांक ः ओजस तुषार मुसळे, द्वितीय क्रमांक ः वेदश्री संजय येवले, तृतीय क्रमांक ः स्पृहा मुकेश भामरे. उत्तेजनार्थ ः शोर्वी निलेश येवले. परीक्षक ः १) सौ दिपाली सचिन पाटील , २) सौ सारिका पुरकर.
वक्तृत्व स्पर्धा निकाल ः गट-४-  ८ वी ते १०वी  प्रथम क्रमांक ः  अक्षदा नितीन येवले, द्वितीय क्रमांक ः  सिद्धी योगेश अलई
 गट -५ -११वी ते १२वी प्रथम क्रमांक ः  संकेत किरण वाणी, द्वितीय क्रमांक ः  साहिल मनोहर पाटकर
गट -६ - पदव्युत्तर र्पयंत प्रथम क्रमांक ः  पूजा संजय फागणेकर, द्वितीय क्रमांक ः प्रणाली प्रणेश पाटकर, तृतीय क्रमांकः  पियुष बळवंत नेरकर, उत्तेजनार्थ क्रमांक ः रितीक शाळीग्राम अमृतकार परीक्षक ः-१)सौ.स्मिता नरेंद्र सोनजे २)सौ.वैशाली विवेक  नाडकर्णी.
वेशभूषासह वक्तृत्व स्पर्धा निकाल प्रथम क्रमांक ः श्रेया हेमंत सोनजे, द्वितीय क्रमांक ः काव्या पंकज धामणे, तृतीय क्रमांक ः यश सचिन  सोनगिरे, उत्तेजनार्थ ः  आराध्य प्रशांत मालपुरे परीक्षक ः १)श्री.दिनेश नेरकर   २) सौ.विशाखा कुलकर्णी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील

दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...