पाचशे चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करून शासनाने एक क्रांतिकारी निर्णयातून सर्वसामान्य, मध्यमवर्गीय मुंबईकर, चाकरमानी कष्टकरी, यांना नववर्षाची विशेष आणि मोठी भेट देवून दिलासा दिलाय यात वाद नाही. एक अभिनंदनीय आणि स्तुत्य निर्णय असंच म्हणावं लागेल. त्याच प्रमाणे तीन चार वर्षांपूर्वी ग्रामीण भागात घरांवर तीस टक्के घरपट्टी करात घसघशीत वाढ करून ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक, कष्टकरी आणि व्यावसायिक यांचे जणू कंबरडेच मोडून ठेवले आहे. महाआघाडी शासनाने जसा सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकाभिमुख निर्णय घेतलाय त्या प्रमाणे ग्रामीण भागातील घरपट्टी कर माफ करावा अथवा जर माफ करणे अशक्य असेल तर कमीतरी करावा नव्हे निदान तीस टक्के करण्यात आलेली जीवघेणी वाढीव घरपट्टी जरुर रद्द करावी आणि ग्रामीण भागातील जनतेचा, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी यांचा शासनाने दुवा घ्यावा एवढीच अपेक्षा.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे कृतज्ञता पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख: यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्रा तर्फे प्रतिवर्षी नवी मुंबई कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कार्य क...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा