आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

आगरी सेनेच्या वतीने सिद्धगड हुतात्मा दिन निमित्ताने क्रांती ज्योत मशालीचे आयोजन

अंबरनाथ /अविनाश म्हात्रे :- दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता दरवर्षी प्रमाणे आगरी सेना, क्रांतिवीर वामन काळू भोईर, नाभिक सेना व मी अंबरनाथकर सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ येथे सिद्धगड हुतात्मा दिन साजरा करण्यात आला.भारताच्या स्वतंत्र लढ्यात २ जानेवारी १९४३ रोजी पहाटे सिद्धगड मुरबाड येथे हुतात्मा पत्करलेल्या स्वतंत्र वीर हुतात्मा हिराजी पाटील व हुतात्मा भाई कोतवाल यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून क्रांती ज्योत मशाल प्रज्वलित करण्यात आली. अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कोरोना महामारीमुळे मोजक्याच कार्यकर्त्याच्या उपस्थितीत कार्यक्रम सम्पन्न झाला.

    भारतमातेच्या दोन स्वातंत्रवीरांस अभिवादन, स्मरण म्हणून क्रांती ज्योत मशाल अंबरनाथ ते सिद्धगड मुरबाड निघते. परंतु यंदाही कोरोनाचा पुन्हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सिद्धगड येथे हुतात्म्यांची आठवण म्हणून सिद्धगडचा रणसंग्राम यांची आठवण करून देणारे देशभक्ती पर होणारे सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असल्याने क्रांती ज्योत मशाल पुढे न काढता प्रज्वलित करून तिथेच मानवंदना देण्यात व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
   त्या समयी उपस्थित आगरी सेना पदाधिकारी मंगेश शेलार ठाणे जिल्हा सरचिटणीस, संजय फुलोरे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख तसेच अंबरनाथ तालुका पदाधिकारी फुलाजी पाटील, दीपक शेलार, चंद्रकांत भोईर, जयहरी भोईर, बळवंत भोईर, अविनाश म्हात्रे, गणेश जाधव, सुजाता भोईर, ज्योत्स्ना भोईर, साहिल शेलार, मनोज शेलार, दिलीप भोईर, नाभिक सेनेचे भिकाजी सपकाळ, ललित कदम, विनोद गवळी, विजय तांदूळकर, विनोद गाडेकर, मी अंबरनाथ सामाजिक संघटनेचे रमेश डोंगरे, भोसले, संदेश अनभोरे, सचिन चव्हाण, मनोहर पाटील आदी मान्यवर व समाज बांधव स्वतंत्र वीरांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे कृतज्ञता पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख: यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्रा तर्फे प्रतिवर्षी नवी मुंबई कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कार्य क...