आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

ओम दत्त श्री ठाकूर महाराज पथ नामफलकाचे उद्दघाटन

पुणे- कोथरूड येथील उजवी भुसारी कॉलनी येथे सौदामिनी येथील पथावर ओम दत्त श्री ठाकूर महाराज पथ च्या नामफलकाचे उद्दघाटन आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते झाले. परमपूज्य मामी माता यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी नगरसेवक दिलीप वेडेपाटील, डॉ. श्रद्धा प्रभुणे पाठक, श्री ठाकूर महाराज ओम दत्त ट्रस्ट चे   अविनाश भोसले , नितीन म्हात्रे, किरण दगडेपाटील, ऑड. गणेश वरपे, हितेंद्र पवार, राजेंद्र भोसले, व ओम दत्त परिवारातील बंधू , भगिनी  मोठया प्रमाणात उपस्थित होते.यावेळी ओम दत्त ठाकूर महाराज यांचे कार्य खूप अफाट आहे पण महाराज प्रसिध्दी पासून दूर होते अशी मान्यवर मंडळी नी आपले विचार मांडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!

मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न! गडब(अवंतिका म्हात्रे) : महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शि...