आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३ जानेवारी, २०२२

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते पनवेल उपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस व रक्त साठवणूक केंद्राचे उद्घाटन संपन्न

पनवेल  :- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे डायलेसिस व रक्त साठवणूक केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले.

     यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन संकपाळ, पदाधिकारी व आदी मान्यवर उपस्थित होते.

        यावेळी पालकमंत्री.कु. तटकरे यांनी आपण पालकमंत्री या नात्याने नागरिकांना आरोग्यविषयक सर्व प्रकारच्या सोयीसुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!

मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न! गडब(अवंतिका म्हात्रे) : महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शि...