आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३ जानेवारी, २०२२

पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश

उरण (विठ्ठल ममताबादे )- उरण तालुक्यात बोकडवीरा येथे द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या 21 व्या युवा महोत्सवाचे उदघाटन दि 2/1/2022 रोजी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.दिनांक 2/1/2022 रोजी आदितीताई तटकरे यांच्या उरण तालुका दौऱ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे उदघाटन करणे, नागरी समस्या जाणून घेणे तसेच पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ठरलेल्या दौऱ्या प्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर यांच्या शिफारशी नुसार प्राथमिक आरोग्य केंद्र दिघोडे येथील जागेची पाहणी आदितीताई तटकरे यांनी केली. तदनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष भार्गव पाटील यांच्या विनंतीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पागोटे कार्यालयाचे उदघाटन आदितीताईनी केले. तर मागासवर्गीय सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण अध्यक्ष मंगेश कांबळे यांच्या शिफारशीनुसार उरण बेलापूर टॅक्षी संघटना चारफाटा उरण येथे बोर्डाचे अनावरण, तसेच जे एन पी टी पुनर्वसित कोळीवाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बोर्डाचे अनावरण आदितीताईच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उरण दौऱ्यात अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील व पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.

     यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, जिल्हा उपाध्यक्ष भार्गव पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष समाधान म्हात्रे,जिल्हा सरचिटणीस -पुखराज सुतार,जिल्हा सरचिटणीस दिपक माळी,उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर, तालुकाध्यक्ष मनोज भगत, युवक तालुकाध्यक्ष कैलास भोईर, शहराध्यक्ष गणेश नलावडे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

देव फाउंडेशनचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अडवली भूतावली शाळेत विद्यार्थी सहाय्य उपक्रम संपन्न

नवी मुंबई(वैभव पाटील)  मुंबईच्या देव फाउंडेशन यांच्या वतीने नवी मुंबईतील अडवली भूतावली येथील महागरपालिकेच्या शाळा क्...