आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३ जानेवारी, २०२२

आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते द्रोणागिरी महोत्सवाचे उदघाटन

उरण (विठ्ठल ममताबादे )- रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन या बिगर राजकीय सामाजिक कला क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या संस्थे तर्फे जिल्हा स्तरीय 21 वा युवा महोत्सव दि 2 ते 6 जानेवारी 2022 दरम्यान एन एम एस ई झेड (सेझ )मैदान, पोलीस चौकी जवळ, केअर पॉईंट हॉस्पिटल समोर,बोकडवीरा, तालुका उरण येथे मोठ्या थाटामाटात मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना विषयक सर्व नियम व अटींचे पालन करत सोशल फिजिकलं डिस्टन्स पाळून मास्क व सॅनिटायझरचा वापर करून नियमांच्या अधीन राहून संपन्न होणार असून विविध देशी विदेशी असे 132 हुन अधिक स्पर्धांचा या म्होत्सवात समावेश आहे.दिनांक 2/1/2022 रोजी या स्पर्धेचे उदघाटन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते झाले.यावेळी पालकमंत्री आदितीताई तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर,जिल्हा उपाध्यक्ष भार्गव पाटील,माजी आमदार मनोहरशेठ भोईर,काँगेसचे सक्रिय पदाधिकारी डॉ मनीष पाटील,द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, वैशाली घरत तसेच  दिग्गज नेते, विविध सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध व्यक्ती, सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

     सर्वप्रथम श्री द्रोणागिरी देवी (करंजा )येथून क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर क्रीडा ज्योतीचे क्रीडा संकुलात आगमन त्यानंतर ध्वजारोहन, त्यानंतर क्रीडा महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तदनंतर पाहुण्यांचे स्वागत व मार्गदर्शन झाले

     सदर उदघाटन प्रसंगी प्रस्तावनेत द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे महादेव घरत यांनी उरण तालुक्यात विद्यार्थ्यांना खेळाडूंना खेळण्यासाठी सुसज्ज असे हक्काचे मैदान नसल्याची खंत बोलून दाखवली व पालकमंत्री आदितीताई तटकरे यांना खेळासाठी सुसज्ज असे उरण तालुक्यात मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी द्रोणागिरी युवा महोत्सवाची माहिती महादेव घरत यांनी उपस्थितांना दिली.

    आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना आदितीताई यांनी द्रोणागिरी महोत्सव व केलेल्या नियोजनाचे कौतुक केले. तसेच उरणच्या विकासासाठी महाविकास आघाडी कठीबद्ध असून उरण तालुक्यात सुसज्ज असे शासकीय हॉस्पिटल त्वरित उभारण्यासाठी व सुसज्ज असे खेळासाठी मैदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.त्यासाठी सिडको, जे एन पी टी व संबंधित प्रशासन सोबत बैठका, पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविणार असल्याचे आदितीताई यांनी सांगितले.

     या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना द्रोणागिरी पुरस्कार देण्यात आला. प्रियांका भोईर -न्यू पनवेल (कला क्रीडा शैक्षणिक), हार्दिका पाटील -पेण रावे (शैक्षणिक ), चेतन पाटील -खोपटे (कला ), भाग्यश्री घरत -सावरखार जोडी (कला ), पुष्पलता ठाकूर -नेरे पनवेल (सामाजिक ), रिद्धी म्हात्रे -रंजणखार -अलिबाग (शैक्षणिक ), आराध्य पाटील -पागोटे (गिऱ्यारोहक ), समीर म्हात्रे-कळंबूसरे (शैक्षणिक ),भूषण तांबे -पनवेल (साहित्य ), सुहास नाईक -टाकीगाव( शैक्षणिक ), मानसी कोळी -पनवेल (क्रीडा ), संतोष म्हात्रे -गोवठणे शैक्षणिक ), संगीता ढेरे -उरण (सामाजिक ), गिरीश कुडव -उरण( शैक्षणिक ), श्रवण बने -उरण (शैक्षणिक ), उदय माणकावले -पेण (सामाजिक ),अश्विनी धोत्रे -उरण (सामाजिक )यांना द्रोणागिरी भूषण पुरस्कार 2022 देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.तर अनेक क्षेत्रातील मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यामध्ये एल बी पाटील (साहित्यिक ), पुंडलिक म्हात्रे (साहित्यिक ), डॉ वीर (वैद्यकीय ),सामीया बुबेरे (सामाजिक ), संस्कार म्हात्रे, डॉ सत्या ठाकरे, अधिकार पाटील, प्रतीत पाटील, डॉ प्रशांत बोन्द्रे, दिगंबर कोळी आणि सहकारी, जागृती ठाकूर, संतोष ठाकूर, अमेया घरत, चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण या व्यक्तींना /संस्थांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

देव फाउंडेशनचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अडवली भूतावली शाळेत विद्यार्थी सहाय्य उपक्रम संपन्न

नवी मुंबई(वैभव पाटील)  मुंबईच्या देव फाउंडेशन यांच्या वतीने नवी मुंबईतील अडवली भूतावली येथील महागरपालिकेच्या शाळा क्...