आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३ जानेवारी, २०२२

बदलापूरमध्ये प्रथमच शतायुषी निसर्ग उपचार केंद्र व होप फाउंडेशनच्या वतीने डॉ. प्रवीण निचत यांच्या मार्फत शुद्धी क्रिया व आरोग्य शिबीर यशस्वीरीत्या संपन्न


ठाणे /प्रतिनिधी :
डॉक्टर प्रवीण निचत हे सुप्रसिद्ध  निसर्ग उपचार तज्ज्ञ व ऍक्युपंचरिस्ट असून ते गेल्या २ दशकांपासून नैसर्गीक पद्धतीने रुग्ण सेवा देत आहेत. त्यांचे असंख्य रुग्ण व्याधीमुक्त झाले आहेत. त्यांना आत्ता पर्यंत १६५ हुन अधिक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पुरस्कराने सन्मानित केले आहे.

    शतायुषी निसर्ग उपचार केंद्र व होप फाउंडेशन च्या वतीने बदलापूर  मध्ये  प्रथमच शुद्धी क्रिया व आरोग्य शिबीर घेण्यात आले.   नववर्षाच्या  पहिल्या दिवशी  १ जानेवारीस  ००२ अण्णा नाना बिल्डिंग ,कृष्णा कुटीर जवळ, जाधव कॉलोनी बळावली बदलापूर ह्या ठिकाणी  हे  शिबीर  लोकाग्रहास्तव घेण्यात आले होते. यावेळी  डॉक्टरांनी आरोग्य व स्वास्थ्य योग्य - निरोगी ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले. या शिबिरात जलनेती , नेत्र स्नानचे फायदे व महत्व समजावून रुग्णांकडून ते  करून घेतले. ह्यात विविध आजारांवर नैसर्गिक पद्धतीने उपचार केले गेले. त्यात विशेष म्हणज दोरखंडाने  रक्तातील  गाठी, पायातील गोळे येणे असे विविध आजार कसे बरे होऊ शकतात ह्याचे प्रात्यक्षिक दाखून उपचार केले गेले. डॉ.प्रविन निचत यांनी  लोकांना थेरेपी, दुखण्यावर मॉलिश करून रुग्ण सेवा दिली. त्यांच्या दुखण्यावर आराम पडल्यामुळे लोकांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिले  आणि असे शिबीर वारंवार घ्यावेत अशी विनंती केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

देव फाउंडेशनचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अडवली भूतावली शाळेत विद्यार्थी सहाय्य उपक्रम संपन्न

नवी मुंबई(वैभव पाटील)  मुंबईच्या देव फाउंडेशन यांच्या वतीने नवी मुंबईतील अडवली भूतावली येथील महागरपालिकेच्या शाळा क्...