आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

देशसेवेसाठी युवकांनी समर्पित व्हावे: डॉ. संजय देसाई

मार्गताम्हाने : येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभाग व फोरम फॉर व्हॅल्यू एज्यूकेशन यांच्या संयुक्त  विद्यमाने  स्वामी विवेकानंदांच्या 159 व्या जन्मदिन प्रसंगी स्वामी विवेकानंदांचे विचार या विषयावरती आयोजित आभासी व्याख्यानामध्ये प्रमुख वक्ते डॉ संजय देसाई  उपप्राचार्य कर्मवीर हिरे कला, वाणिज्य , विज्ञान व शिक्षण शास्त्र महाविद्यालय, गारगोटी ,तालुका भुदरगड ,जिल्हा- कोल्हापूर यांनी देशसेवेसाठी युवकांनी समर्पण करण्याची भावना बाळगणे फार महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले.आजच्या  करोना च्या  काळात स्वामी विवेकानंदांच्या विचार प्रत्येकाने आत्मसात करणे महत्वाचे आहे . पूर्ण भारतभर राष्ट्रीय युवा दिन हा विवेकानंदांची आठवण म्हणूनच साजरा केला जातो .ज्याप्रमाणे विवेकानंदांनी आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या मार्गदर्शनाखाली आपले व्यक्तिमत्व चांगले बनवले त्याप्रमाणे प्रत्येक युवकाने आपले व्यक्तिमत्व आदर्श बनवावे असे सांगितले. देशाच्या उज्ज्वल भविष्यामध्ये शिक्षणाचे महत्वाचे योगदान असून प्रत्येक युवकाने शिक्षण घेण्यासाठी स्वामी विवेकानंदांचा आदर्श अंगीकारला पाहिजे असे त्यांनी सांगितले. आजचा युवक हा मोबाईलच्या आहारी गेल्याने विकृत बनत चालला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मोबाईल  ज्ञानप्राप्तीसाठी वापरला तर  तो वरदान ठरू शकेल, असे स्पष्ट केले. विवेकानंद यांच्याकडील सत्य ,न्याय, आत्मनिर्भर या बळावर  त्यांनी अमेरिकेतील शिकागो येथील परिषदेत संपूर्ण भारतीयांचे नेतृत्व करुन संपूर्ण जग जिंकले

म्हणूनच राजा अजितसिंग सारख्या राजाने त्यांना विवेकानंद ही उपाधी दिली. युवा पिढीने स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेल्या  12 पुस्तकांचा चांगला अभ्यास केला पाहिजे .भारताच्या सामाजिक , सांस्कृतिक, वैचारिक जडणघडणीमध्ये युवकांचे योगदान वाढण्यासाठी प्रत्येक युवकाने विवेकानंदांचे विचार आत्मसात केले पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.प्राचार्य डॉ. विजयकुमार खोत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये स्वामी विवेकानंदांच्या विचारांच्या योगदानाचे महत्त्व विशद केले

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. युवराज जाधव यांनी केले तर प्रास्ताविक  आय. क्यू .ए .सी .समन्वयक डॉ. सुरेश सुतार यांनी केले. आभार हिंदी विभाग प्रमुख प्रा. रामचंद्र माने यांनी मानले .याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

२६/११ च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !

मुलुंड( सतिश वि.पाटील)२६/११ च्या भ्याड हल्ल्यात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या ...